Salman Society : रामदास आठवलेंकडून ‘सलमान सोसायटी’ च्या टीमचं कौतुक

Salman Society
Salman Society

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या सोशल मीडियावर नुकत्याच रिलीज झालेल्या 'सलमान सोसायटी' ( Salman Society ) या चित्रपटाची चर्चा आहे. काही दिवसापूर्वी चित्रपटातील हटके गाणी आणि धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आले असून ते चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहे. या चित्रपटाचा विषय शिक्षणावर आधारित असल्याने केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना खुप आवडला आणि त्यांनी चित्रपटातील टीमला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कसा अभ्यास केला? आणि आपल्या चित्रपटांमधून मुलं कशी शिक्षण घेतात? यावर भाष्य केलं आहे. या चित्रपटाला खूपच प्रतिसाद मिळत आहे.

संबंधित बातम्या 

तसेच मराठी चित्रपट सृष्टीतील नामवंत आणि दिग्गज कलाकांरासोबत दिग्दर्शक अभिनेता प्रसाद ओक, अभिनेता उपेंद्र लिमये, अंशुमन विचारे, विजय पाटकर, पुष्कर जोग, अभिजीत श्वेतचंद्र, शिल्पा तुलस्कर, कमलेश सावंत यांनी ही शुभेच्छा दिल्या आहेत. 'सलमान सोसायटी' चित्रपटाचे दिग्दर्शन कैलाश पवार व निर्मिती रेखा सुरेंद्र जगताप, शांताराम खंडू भोंडवे व वैशाली सुरेश चव्हाण याच्यासह प्राजक्ता एन्टरप्राईजेसच्या बॅनर अंतर्गत करम्यात आली आहे. 'सलमान सोसायटी' हा चित्रपट शिक्षणावर भाष्य करतो. 'भारत देश साक्षर होईल तेव्हा भारताचा विकास होईल' या टॅगलाईनवर आधारीत आहे.

चित्रपटाला संगीत श्रेयस आंगणे, मॅक्सवेल फर्नांडिस आणि मिलिंद मोरे यांनी दिले असून डीओपी फारूक खान आहेत. या चित्रपटात आपल्या अभिनयाने सर्वाना प्रभावित करणारा गौरव मोरे एका वेगळ्या महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. तसेच पुष्कर लोणारकर, शुभम मोरे आणि विनायक पोतदार ही बच्चे कंपनी मुख्य भूमिकेत आहेत.

चित्रपटामध्ये उपेंद्र लिमये पाहुण्याच्या भूमिकेत आहे. तसेच देवकी भोंडवे, वनिता खरात, नम्रता संभेराव, कुणाल मेश्राम, शेषपाल गणवीर, नरेंद्र केरेकर, तेजस बने आदी कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. 'सलमान सोसायटी' ( Salman Society ) हा चित्रपट १७ नोव्हेंबर २०२३ रोजी चित्रपट गृहात प्रदर्शित झाला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news