MIG-21 Crash : मिग २१ विमानांच्या दुर्घटनांमध्ये आतापर्यंत जवळपास २०० जणांचा बळी

MIG-21 Crash : मिग २१ विमानांच्या दुर्घटनांमध्ये आतापर्यंत जवळपास २०० जणांचा बळी

[visual_portfolio id="275975"]

पुढारी ऑनलाइन डेस्क : राजस्थानच्या बाडमेरमध्ये भारतीय वायूसेनेचे एक लढाऊ विमान 'मिग -21' गुरुवारी रात्री एका अपघातात क्रॅश झाले. या दुर्घटनेत भारतीय वायूदलातील दोन वैमानिकांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे 'मिग-21' हे विमान पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, आतापर्यंत मिग 21 विमानांच्या 400 पेक्षा जास्त दुर्घटनांमध्ये जवळपास '200' जणांचा बळी गेला आहे. एकट्या 2021 या वर्षात मिग 21 चे चार वेळा अपघात झाले आहेत. संसदेत बजट सत्रादरम्यान उत्तर देताना नवीन विमान सैन्याला सोपवण्याच्या प्रक्रियेत उशीर होत असल्याने चीता, चेतक आणि मिग 21 ही विमाने सैन्याला वापरावी लागत आहेत. कधी काळी भारतीय वायूदलाची शान असलेल्या मिग 21 या विमानाला आता आणखी किती दिवस सैन्य दलात ठेवणार आहे, हा प्रश्न आता चर्चेत येत असला तरी या विमानाचे लष्करी महत्व फार आहे, याला खतरों का खिलाडी, फ्लाइंग कॉफिन असेही म्हणतात तर चला आपण या 'मिग 21' विषयी जाणून घेऊ या…

मिग 21 ही 1959 मध्ये विकसित केलेल्या जगातील पहिल्या सुपरसोनिक लढाऊ विमानांपैकी एक आहे. हे एकमेव असे विमान आहे ज्याला अख्ख्या जगभरातील जवळपास 60 देशांनी याचा वापर केला आहे. मिग -12 पासून भारतीय वायूदलात 1964 मध्ये हे लढाऊ विमान सहभागी झाले होते. भारतातील पहिल्या सुपरसोनिक फाइटर जेटच्या रुपात भारतीय वायूदलात समाविष्ट करण्यात आले होते. पहिले आपण हे विमान रशियाकडून घ्यायचो मात्र नंतर त्याचे असेम्बल करण्याचा अधिकार मिळवला आणि नंतर त्याचे तंत्रज्ञानही अवगत करून घेतले. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडला या विमानांच्या निर्माणाचे लायसन्स मिळाले होते. त्याअंतर्गत मिग-21 या लढाऊ विमानाचे प्रोडक्शन सुरू करण्यात आले होते. रशियाने या विमानाचे उत्पादन 1985 मध्ये बंद केले मात्र भारताने याचे अपग्रेडेड वेरियंट वापरणे कायम ठेवले आहे.

फ्लाइंग कॉफिन (उडता ताबूत) काय आहे?

मिग 21 विमानांच्या सीरिजमध्ये भारताकडे सध्या सहा स्क्वाड्रन (ताफा) आहेत एका स्क्वाड्रनमध्ये (ताफ्यामध्ये) जवळपास 18 विमाने असतात. 1959 मध्ये या सीरिजमधील मिग 12 हे पहिले सुपरसोनिक विमान भारतीय वायुदलात दाखल झाले होते. हे विमान त्यावेळच्या सर्वात गतिमान विमान असलेल्या पहिल्या सुपरसोनिक विमानांपैकी एक आहे. याच्या गतिमानतेमुळे अमेरिकादेखील घाबरत असे. मिग हे एकमेव असे विमान आहे ज्याचा वापर जगातील जवळपास 60 देशांनी केला आहे. इतकेच नव्हे अद्यापही भारतासह अनेक देशांच्या वायुदलात हे विमान अजूनही सेवा देत आहे. एविएशनच्या इतिहासातील मिग 21 हे आतापर्यंत सर्वाधिक बनवले गेलेले लढाऊ विमान आहे. आतापर्यंत 11496 युनिट्स निर्माण करण्यात आले आहे. या विमानाचा क्रैश रेकॉर्ड पाहून या विमानाला फ्लाइंग कॉफिन म्हणजेच उडता ताबूत असे नाव दिले आहे.

मिग – 21 चे लष्करी महत्व

मिग -21 या विमानाचे लष्करी महत्व खूप आहे ते त्याच्या एकापेक्षा एक केलेल्या सरस कामगिरीमुळे. तसेच युद्धातील या विमानाच्या वर्णनाचे किस्से तर अनेक आहेत. पण सर्वात अलीकडचे उदाहरण द्यायचे झाले तर बालाकोट एअरस्ट्राइक नंतर भारतीय वायूसेनेचे कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानच्या एफ-16 ला हाणून पाडले होते. मात्र याचा पाकिस्तानने उघड-उघड स्वीकार केले नाही. कारण पाकिस्तानचे एफ-16 हे विमान पाकिस्तानी वायुदलाच्या पाठीचा मणका आहे. अमेरिकेकडून खरेदी केलेले एफ 16 या अत्याधुनिक विमानाला 60 वर्ष जुने तंत्रज्ञान असलेल्या मिग विमानाकडून मात मिळणे हे दोघांसाठीही असहनीय होते. तर असे आहे हे मिग 21.

कारगिल युद्धात मिग विमानांची भूमिका महत्वाची

पाकिस्तानासोबत झालेल्या 1971 आणि 1999 च्या कारगिल युद्धात मिग-21 ने अहम भूमिका निभावली होती. मिग 21 हे बाइसन लढाऊ विमान मिग-21 चे एक अपग्रेडेड वर्जन आहे. ज्यामुळे पुढील 3 ते 4 वर्ष त्याचा उपयोग केला जाऊ शकतो. या वर्जनचा उपयोग फक्त भारतीय वायूसेना करते. अन्य देश याचे वेगवेगळे वेरियेंट वापरतात.

असं काय विशेष आहे मिग 21 मध्ये

मिग 21 बाइसन हे लढाऊ विमान मिग अनेक घातक एअरक्राफ्ट शॉर्ट रेंज आणि मीडियम रेंज एअरक्राफ्ट मिसाइलने हल्ला चढवण्यात सक्षम आहे. या लढाऊ विमानाचा स्पीड 2229 किमी प्रति तास आहे. जो त्या वेळचे गतिमान उड्डाण करणारे लढाऊ विमान होते. याची रेंज 644 किमी च्या जवळपास होती. मात्र भारताचे बाइसन अपग्रेडेड वर्जन जवळपास 1000 किमी पर्यंत उडान भरू शकते. यामध्ये टर्बोजेट इंजन बसवण्यात आले आहे जे विमानाला सुपरसोनिक गति प्रदान करते.

…याने अमेरिकी वायूदलाच्या नाकी नऊ आणले होते

व्हिएतनाम युद्धाच्या वेळी या विमानांनी व्हिएतनामच्या तत्कालीन कम्युनिस्ट सरकारकडून लढून अमेरिकी वायूदलाच्या नाकी नऊ आणले होते. एकट्या मिग-21 ला घेरण्यासाठी अमेरिकेच्या 6 लढाऊ विमानांना तैनात करावे लागले होते. ज्या भागात विएतानामच्या कम्युनिस्ट सरकारने मिग-21 उड्डाण करायचे त्या भागात अमेरिका चुकूनही आपले हेलिकॉप्टर पाठवत नसे. मात्र, अमेरिकी लढाऊ विमानांची संख्या आणि घातक मिसाइल्समुळे अनेक मिग-21 विमान पाडण्यातही यश आले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news