कोल्हापूर: भोगावती साखर कारखान्याचे अडीच हजार सभासद अपात्र; विरोधकांना धक्का

कोल्हापूर: भोगावती साखर कारखान्याचे अडीच हजार सभासद अपात्र; विरोधकांना धक्का
Published on
Updated on

राशिवडे: पुढारी वृत्तसेवा : शाहूनगर परिते (ता.करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी साखर कारखान्याने प्रसिध्द केलेल्या कच्च्या मतदार यादीवर राष्ट्रवादी, भाजप, स्वाभिमानी संघटना, शेकाप, काँग्रेस (सतेज पाटील गट) यांनी आक्षेप घेतला होता. तसेच साखर सहसंचालकांकडे तक्रार केली होती. यावर सुनावणी होऊन साखर सहसंचालकांनी २ हजार ६८३ सभासद अपात्र ठरविले. त्यामुळे विरोधकांना धक्का मानला जात आहे. तर आता भोगावतीच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

भोगावती साखर कारखान्याने कच्ची  पात्र मतदार यादी जाहीर केल्यानंतर विरोधकांनी एकत्र येत या यादीवर साखर सहसंचालकाकडे हरकत घेतली होती. संचालक मंडळाला अधिकार नसताना अपात्र केलेल्या २ हजार ६८३ सभासदांना पात्र करण्याची मागणी केली होती. यावर साखर सहसंचालक गाडे यांच्यासमोर दोन दिवस सुनावणी झाली.

यामध्ये २ हजार ६८३ पात्र मतदारांची नावेच यादीतून गहाळ केल्याची तक्रार केली होती. हे सर्व सभासद कारखान्याचे कायदेशीर सभासद असून त्यांना वगळण्याची कारणे नाहीत. ते अपात्र किंवा स्वतःहून सभासदत्वाचा राजीनामा दिलेला नाही. ते नियमानुसार निवडणुकीचे मतदार ठरू शकतात, अशी मागणी केली होती. यावर सर्वपक्षीयांच्या वतीने युक्तिवाद करताना अॅड. प्रबोध पाटील, अॅड नेताजी पाटील यांनी सभासद अपात्र करण्याचे अधिकार संचालक मंडळाला नसून हे सभासद नियमानुसार अपात्र होत नसून त्यांना पात्र ठरवावे, असे म्हटले होते.

तर कारखान्याच्यावतीने अॅड. लुईस शहा यांनी संबंधित सभासदांना नोटीसा पाठवूनही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्याने ते अपात्र ठरले, असे सांगितले होते. यावर गाडे यांनी २६८३ सभासद अपात्र असल्याचा निकाल देत विरोधकांचा अर्जच निकालात काढला. यामुळे विरोधकांना दणका बसला आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news