मलायका अरोरा आणि अरबाज खान पुन्हा आले एकत्र?

मलायका अरोरा आणि अरबाज खान पुन्हा आले एकत्र?
मलायका अरोरा आणि अरबाज खान पुन्हा आले एकत्र?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क :  बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अरबाज खान यांनी २०१७ मध्‍ये घटस्फाेट घेतला आहे. सध्या अरबाज खान आणि मलायका वेगळे राहतात. ही जोडी बॉलिवूडमध्ये एकेकाळी प्रसिध्द होती; या दोघांना एक मुलगाही आहे. त्याच नाव अरहान खान तो शिक्षणासाठी विदेशात असतो.

मलायका अरोरा, अरबाज खान, अरहान खान यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. अरहान हा सध्या शिक्षणासाठी परदेशात असून त्याला आता सुट्ट्या लागल्याने तो भारतात परतला आहे. तो भारतात आल्यानंतर त्याला विमानतळावरून घेण्यासाठी आई मलायका आणि वडील अरबाज हे गेले होते. त्यावेळी मलायका आणि  अरबाज खान एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.

या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात अरहान खान उच्च शिक्षणासाठी विदेशात गेला होता. रविवार ताे परतला. र विमानतळावर मलायका आणि अरबाजने अरहानचे स्वागत केले आहे. यावेळी आई मलायका भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. मलायका इन्स्टाग्रामवर अरहानबद्दल नेहमी पोस्ट करत असते. यात ती अरहानबद्दल लिहित असते.

मलायका आणि अरबाज यांचा २०१७ मध्ये घटस्फोट झाला होता. सध्या मलायका अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे तर अरबाज जॉर्जिया एंड्रियानी सोबत रिलेशनशिपमध्ये आहे. अर्जुन कपूरसोबतचे फोटो मलायका नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असते.
मलायका आणि अरबाज या दोघांना एकत्र बघून पुन्हा एकत्र आल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या.

मलायका अरोरा-अर्जुन कपूर यांचा स्विमिंग पूलमध्‍ये व्यायाम

मलायका अरोरा-अर्जुन कपूर यांची लव्हस्टोरी कोणापासून लपलेली नाही. दोघांनीही अनेकदा आपलं प्रेम व्यक्त केलंय. दोघांनाही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. आता दोघांचेही मालदीवमधील फोटो, व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. दोघांनीही सुट्ट्य़ा एन्जॉय केल्या आहेत. त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ यासाठी खास आहे की, मलायका अरोरा-अर्जुन कपूर स्विमिंग पूलमध्ये वर्कआऊट करताना दिसत आहेत.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news