Malaika Arora :’माझा आळशी बॉय’; मलायकानं शेअर केला अर्जुनचा प्रायव्हेट फोटो

Malaika Arora
Malaika Arora
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूर दोघेजण नेहमीच एकमेंकासोबत टाईम्स स्पेंड करत असतात. काहीवेळी दोघेजण डिनर डेट, नाईट पार्टीत तर काहीवेळा परदेशात एकमेंकासोबत फिरण्याचा मनसोक्त आनंद घेत असतात. दरम्यानच्या एकापेक्षा एक हटके फोटोंमुळे मलायका आणि अर्जूनला रोमॉन्टिक कपल म्हटलं जाते. मलायकाने ( Malaika Arora ) पुन्हा एकदा अर्जुनचा प्रायव्हेट फोटो शेअर केला आहे. या फोटोची कॅप्शन वाचून चाहत्यांनी कॉमेन्टचा पाऊस पाडलाय.

अभिनेत्री मलायका अरोराने ( Malaika Arora ) तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून बॉयफ्रेंडचा एक बोल्ड आणि प्रायव्हेट फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये बॉयफ्रेंड अर्जुन कपूर घरातील एका सोफ्यावर बसलेला असून त्याने यावेळी अंगावर कपडे परिधान केलेले नाहीत. मात्र, एका लहान उशीच्या मदतीने शरीर झाकण्याचा प्रयत्न केला आहे. हा फोटो ब्लॅक अँड व्हाईट असून अर्जुनच्या शरीरावरील टॅटू स्पष्टपणे दिसत आहे. मलायकाने हा फोटो शेअर करत लिहिले आहे की, 'माझा अतिशय आळशी बॉय'.

मलायकाच्या या फोटोनंतर अर्जुनने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर या फोटोचा स्क्रीनशॉट पोस्ट केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव करत कॉमेन्टचा पाऊस पाडलाय.

अर्जुन आणि मलायका ( Malaika Arora ) अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मलायकाने अर्जुनवर प्रेमाचा वर्षाव करण्याची ही पहिलीच वेळ नाही. हे जोडपे अनेकवेळा हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करून एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त असते. दरम्यान मलायकाने काही दिवसापूर्वी एका मुलाखतीत दुसरे लग्न करण्याचा विचार असल्याचा खुलासा केला होता. मात्र, याबाबतची अधिकृत्त महिती समोर आलेली नाही.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अर्जुन 'लेडी किलर' चित्रपटात अभिनेत्री भूमी पेडणेकरसोबत दिसणार आहे. याशिवाय अर्जूनकडे रकुल प्रीत सिंह आणि भूमी पेडणेकरसोबत एक अनटायटल चित्रपट आहे. अर्जुन शेवटचा 'कुत्ते' चित्रपटात दिसला होता.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news