Maharashtra NCP crisis | अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्रालयासमोर नवे पक्ष कार्यालय; आज लोकार्पण

अजित पवार
अजित पवार
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्‍तसेवा, अजित पवार (Maharashtra Deputy CM Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पक्ष कार्यालयासाठी मंत्रालयासमोरील ए -५ हा शासकीय बंगला देण्यात आला आहे. या कार्यालयाचे आज (मंगळवार) सकाळी उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. (Maharashtra NCP crisis)

सध्या मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईतील बेलॉर्ड पियर येथे प्रदेश कार्यालय आहे. आता अजित पवार यांनी वेगळी वाट धरल्यामुळे त्यांच्या गटासाठी सरकारने मंत्रालयासमोरील ए -५ हा शासकीय बंगला दिला आहे.

दादर येथील जुने शिवसेना भवन पाडून त्याच जागेवर नवीन शिवसेना भवन उभारण्यात येणार होते. त्यासाठी तात्पुरती सोय म्हणून शासनादेश काढून तत्कालीन राज्यमंत्री रवींद्र वायकर यांचा सी -४ हा मंत्रालयासमोरील शासकीय बंगला पक्ष कार्यालयासाठी दिला होता.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी याच रांगेतील शासकीय बंगला कार्यालयासाठी देण्यात आला आहे. बाळासाहेब भवन या नावाने हा बंगला ओळखला जात आहे. (Maharashtra NCP crisis)

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news