Maharashtra Budget 2023 : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतील मर्यादा पाच लाखांवर

Maharashtra Budget 2023 : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतील मर्यादा पाच लाखांवर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत उपचाराची मर्यादा वार्षिक दीड लाखांवरून पाच लाख रुपये करण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना केली.

महिलांच्या आरोग्यासाठी 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' अभियानांतर्गत चार कोटी महिला व मुलींची आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात येतील. राज्यातील अंगणवाडी मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची रिक्त असलेली सुमारे वीस हजार पदे भरण्यात येतील. असेही घोषणा देंवेद्र फडणवीस यांनी केली आहे.

धनगर समाजाला 1000 कोटी

धनगर समाजाला 1000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्र मेंढी, शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करणार आहे. यातून 10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. 'मागेल त्याला शेततळे' योजनेचा आता व्यापक विस्तार करण्यात येईल. आता मागेल त्याला शेततळे, फळबाग, ठिबक सिंचन, शेततळ्यांचे अस्तरीकरण होईल. मागेल त्याला शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणीयंत्र, कॉटन श्रेडर मिळेल. या योजनेवर 1000 कोटी रुपये खर्च करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news