LPG Price : लोकसभा निवडणुकीदरम्यान दिलासा, व्यावसायिक सिलिंडर झाला स्‍वस्‍त; नवीन दर जाहीर

file photo
file photo

पुढारी ऑनलाईन : तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस (LPG Price) सिलिंडरच्या किमतीत बदल केला आहे. आजपासून 19 किलोग्रॅमच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 19 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. त्‍यामुळे मे महिन्याच्या कडक उन्हाळ्याच्या दिवसातही एलपीजी गॅस सिलिंडरच्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. ऑईल मार्केटिंग कंपन्या दर महिन्याच्या १ तारखेला एलपीजी सिलिंडरच्या (LPG Price Cut) किमती अपडेट करत असतात. आज (बुधवार) नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. मे महिन्याच्या पहिल्‍या दिवशी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 19 रुपयांची कपात झाली आहे. मात्र, देशांतर्गत सिलिंडरचे दर स्थिर आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) देशात मतदान होत आहे. अशा परिस्थितीत या निवडणुकीच्या वातावरणात पुन्हा एकदा सिलिंडरचे दर (LPG Price Cut) कमी झाले आहेत. तेल कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 19 रुपयांनी कपात केली आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात सलग दुसऱ्या महिन्यात कपात करण्यात आली आहे. दिल्लीतील 19 किलो व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किरकोळ विक्री किंमत आजपासून 1,745.50 रुपये आहे.

ही कपात फक्त व्यावसायिक (LPG Price Cut) सिलिंडरवर झाली आहे. घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. व्यावसायिक सिलिंडरचे नवे दर आजपासून लागू झाले आहेत. याचा अर्थ आज तुम्ही सिलिंडर ऑर्डर केल्यास तुम्हाला नवीन दराने सिलिंडर मिळेल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news