Rajasthan Poll: राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या ८३ उमेदवारांची यादी जाहीर

Rajasthan Poll: राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या ८३ उमेदवारांची यादी जाहीर

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची दुसरी यादी आज (दि.२१) जाहीर केली आहे. या यादीत ८३ उमेदवारांची नावे आहेत. वसुंधरा राजे यांना झालरापाटन येथून तिकीट देण्यात आले आहे. ज्योती मिर्धा नागौर मतदारसंघातून निवडणूक लढवणार असून त्यांनी नुकतेच काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर सतीश पुनिया यांना अंबर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. (Rajasthan Poll)

शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपची उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीला गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. या बैठकीला पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डाही उपस्थित होते. यावेळी तेलंगणा, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील उमेदवारांवर चर्चा झाल्याचे समजते. (Rajasthan Poll)

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news