Gangubai Kathiawadi : वेश्यांच्या हक्कांसाठी थेट पंडित नेहरुंना भिडणारी ‘गंगूबाई’ आहे तरी कोण ?

Gangubai Kathiawadi : वेश्यांच्या हक्कांसाठी थेट पंडित नेहरुंना भिडणारी ‘गंगूबाई’ आहे तरी कोण ?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : जी वयाच्या १६ व्या वर्षी वेश्या वस्तीत फसली गेली… जिने बेधडकपणे एका डाॅनच्या घरात घुसून त्याला राखी बांधली… जिचा फोटो प्रत्येक वेश्या महिलेच्या घरात आहे… वेश्यांच्या हक्कांसाठी पंतप्रधान नेहरूंना थेट भिडली…. ती डेरिंगबाज गंगूबाई काठियावाडीच्या (Gangubai Kathiawadi) आहे तरी कोण, जाणून घेऊया…

गुजरातमधील काठियावाड या गावात राहणारी गंगूबाईचं संपूर्ण नाव गंगा हरजीवनदास काठियावाडी असं होतं. तिने खूप शिकावं, असं गंगूबाईच्या आई-वडिलांना वाटत होतं. पण, तिचं मन पुस्तकांत नव्हे तर मुंबईच्या फिल्मीविश्वात रमत होतं.

गंगूबाई अभिनेत्री आशा पारेख आणि हेमामालिनीची खूप मोठी चाहती होती. तिला वाटायचं की, या अभिनेत्रींसारख आपणही व्हावं. ती अभिनेत्री झाली नाही, हे खरं आहे. पण, प्रसिद्ध मात्र नक्कीच झाली. १६ वर्षांची असताना ती रमणीक नावाच्या तरुणाच्या प्रेमात पडली. हा रमणीक गंगूबाईच्या वडिलांकडे काम करत होता.

त्या दोघांचा प्रेम होतं. पण, त्यांना तिच्या आई-वडिलांचा विरोध होता. म्हणून दोघांनी पळून जाऊन लग्न केलं आणि दोघांनी थेट मुंबई गाठली. काही दिवस ते दोघं एकत्र राहिले. एके दिवशी रमणीकने गंगाला सांगितलं की, "मी आपल्यासाठी घर पाहून येतो. तू माझ्या मावशीच्या घरी रहा." रमणीकने मावशीबरोबर गंगाला एका टॅक्सीमध्ये बसवलं आणि कायमचाच निघून गेला.

पण, ती टॅक्सी मावशीच्या घरी नाही तर थेट कामाठीपुरात पोहोचली. खरंतर रमणीकने गंगाशी गद्दारी करून तिला केवळ ५०० वेश्या व्यवसायात विकलेली होती. कामाठीपुरा पाहून ती गडबडली, गोंधळली, किंचाळली. पण, शेवटी तिने परिस्थितीशी तडजोड केली. ती इच्छा असूनही काठियावाड येथे जाऊ शकली नाही.

सेक्सचा आनंद घेण्यासाठी आलेल्या शौकत खानने गंगूबाईवर अत्याचार केले. शौकत हा मुंबईचा कुख्यात डाॅन करीमलालाचा सहकारी होता. गंगूबाईने शौकतचा पत्ता शोधून काढला आणि करीमलालाच्या घरी पोहोचली आणि तिने सर्व परिस्थिती सांगितली. करीमलालाने तिला विश्वास दिला की, "तू निर्धास्त रहा. परत तो तुझ्याकडे आला तर मला कळवं."

गंगूबाईने करीमलाला भाऊ मानत त्याच्या हातावर राखी बांधली. पुढच्या वेळी शौकत गंगूबाईजवळ आला. तिने करीमलालाला कळवलं. करीमलाला लगेच कमाठीपुरात गाठलं आणि शौकत खानला सर्वांसमोर धू धू धुतला… त्याने सर्वांना सांगितलं की, "गंगूबाई ही माझी बहीण आहे. कुणी हात लावला तर याद राखा."

गंगाचा भाऊ डाॅन करीमलाला आहे म्हटल्यावर तिचा कामाठीपुरात पुरता दबदबा निर्माण झाला. त्यानं तिने कामाठीपुराच्या निवडणुकीत भाग घेऊन निवडून आली. त्यानंतर तिने वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या हक्कांसाठी लढाई सुरू केली. ज्या मुलींना फसवून या व्यवसायात आणलं गेलं, त्या सोडवून त्यांच्या घरी सुरक्षित पोहोचविण्यात आलं. आपल्या कामामुळे गंगूबाई (Gangubai Kathiawadi) जास्तच प्रसिद्ध झाली.

कामाठीपुरात वेश्या व्यवसायात महिलांचं पोटपाणी चाललं होतं. पण, तोच कामाठीपुरा बंद करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले तेव्हा गंगूबाई काठियावाडी थेट पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांच्यासमोर बेधडकपणे सर्व प्रश्न मांडले. अशाप्रकारे तिने कामाठीपुरा आणि तिथल्या महिलांच्या पोटापाण्यावर आलेलं बालंट बाजूला केलं.

तिच्या कार्यकर्तृत्वामुळे गंगाबाई काठियावाडीला प्रत्येक वेश्या महिलेच्या घरात आदराने पाहिलं जाऊ लागलं. ती सर्वांची आई झाली. आजही कामाठीपुऱ्यात तिचा पुतळा आहे. तिथल्या महिला मनोभावे पुजतात. अशी ही गंगूबाई आणि तिचं कर्तृत्व लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी संजय लिला भन्साळी यांचा 'गंगूबाई काठियावाडी' नावाचा सिनेमा येतो आहे.

हे वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news