पुणे : लाल महालात रंगली लावणी; मराठी कलाकार वैष्‍णवी पाटीलसह चौघांवर गुन्हा दाखल

पुणे : लाल महालात रंगली लावणी; मराठी कलाकार वैष्‍णवी पाटीलसह चौघांवर गुन्हा दाखल
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : लाल महालामध्ये लावणी नृत्य सादर करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करीत शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी मराठी कलाकार वैष्णवी पाटीलसह चौघां विरूद्ध फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रखवालदार राकेश सोनवणे यांनी फिर्याद दिली आहे.

लाल महालात लावणीवर नृत्य करणाऱ्या तिन्ही व्यक्तींवर फरासखाना पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीभत्स लावणी सादर करणाऱ्या सर्वांना तात्काळ अटक झाली पाहिजे अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली होती.

ऐतिहासिक लाल महालात लावणीचे शुटिंग झाल्याने वादाला तोंड फुटले आहे. या प्रकरणी संभाजी ब्रिगेडने कारवाईची मागणी केली होती. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले होते. वैष्णवी पाटील लाल महालात चंद्रा या गाण्यावर थिरकली होती. त्यावरूनच मोठे वादंग झाले होते. या वादानंतर वैष्णवी पाटीलने इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत जाहीर माफी मागितली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news