कोल्हापूर : रेल्वे सेवा आजपासून पूर्ववत ; नव्या प्लॅटफॉर्मसह विस्तारीकरणाचे काम पूर्ण

कोल्हापूर : रेल्वे सेवा आजपासून पूर्ववत ; नव्या प्लॅटफॉर्मसह विस्तारीकरणाचे काम पूर्ण
Published on
Updated on

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : रेल्वे स्थानकावरील नव्या प्लॅटफॉर्मसह विस्तारीकरणाचे काम बुधवारी रात्री पूर्ण झाले. यामुळे गुरुवारपासून रेल्वे वाहतूक पूर्ववत होणार आहे. उद्यापासून प्लॅटफार्म क्रमांक दोन आणि तीनवरून वाहतूक होणार होणार आहे.

रेल्वे स्थानकावर एक नवा प्लॅटफॉर्म आणि सध्या असलेल्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोनचे विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. नव्या प्लॅटफॉर्मचे काम मंगळवारी पूर्ण झाले, तर बुधवारी दोन प्लॅटफॉर्मवरील ट्रॅक विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाले.

या कामासाठी बुधवारी मेगा ब्लॉक घेण्यात आला होता. सर्व पँसेजर रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. कोयना, कलबुर्गी एक्स्प्रेस मिरजेतून सोडण्यात आली. दुपारी आलेली धनबाद-कोल्हापूर दिक्षाभूमी एक्स्प्रेस सुमारे तासभर स्थानकाबाहेर थांबून होती.

आज सकाळपासून रेल्वे फाटकातून होणारी पादचार्‍यांची येे-जा थांबविण्यात आली होती. दोन्ही बाजूला आरपीएफ जवान तैनात करण्यात आले होते. यामुळे दुपारपर्यंत पादचार्‍यांची परिख पुलातूनच ये-जा सुरू होती. प्लॅटफॉर्म आणि नॉन इंटरलॉकिंग सिस्टिमच्या कामासाठी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, तंत्रज्ञ तळ ठोकून होते. त्यांच्यासाठी विशेष तंबूही मारण्यात आला होता.

गुरुवारपासून रेल्वे सेवा पूर्ववत होईल असे स्थानक प्रबंधक विजय कुमार यांनी सांगितले. सध्याच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक विस्तारला आहे. त्याच्या ट्रॅकचे काम पूर्ण झाले असले, तरी प्लॅटफॉर्म बांधकामासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने या प्लॅटफॉर्मचा वापर बांधकाम होईपर्यंत केला जाणार नाही. यामुळे उद्यापासून सध्याच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोन व तीनवरूनच वाहतूक होणार आहे.

कोयना आज मिरजेतून सुटणार

कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस गुरुवारीही मिरजेतून सुटणार आहे. गुरुवारची मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस कोल्हापुरात येणार असून शुक्रवारपासून या मार्गावरील सेवा नियमित सुरू राहील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news