कोल्‍हापूर : परितेमध्ये प्रसादातून विषबाधा; साठजणांवर उपचार सुरू

food poisoning
food poisoning
Published on
Updated on

राशिवडे ; पुढारी वृतसेवा परिते ता.करवीर येथील विठ्ठल,रुक्मिणी मंदीरामध्ये हरिनाम सप्ताह सुरू आहे. या ठिकाणी प्रसादातून विषबाधा झाल्याने साठहून अधिक लोकांना उलटी, जुलाबाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना राशिवडे बु,इस्पुर्ली, ठिकपुर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

परिते गावामध्ये हरिनाम सप्ताह सुरु आहे, काल (मंगळवार) दुपारी प्रसाद घेतल्यानंतर संध्याकाळी जुलाब, उलटी, संडासचा त्रास होऊ लागला. हळुहळू रुग्णांची संख्या वाढत गेली. आतापर्यत साठहून अधिक जणांना प्रसादातून विषबाधा झाल्याचे आढळून आले आहे. संबधितांवर राशिवडे, ठिकपुर्ली, इस्पुर्ली, सी.पी.आरमध्ये उपचार सुरु आहेत. गोड पदार्थातूनच विषबाधा झाल्याची शक्यता असून इस्पुर्ली आरोग्य केंद्रातील कर्मचारी गावात दाखल झाले आहेत. घरनिहास तपासणी केली जात आहे.

रुग्ण संख्या आटोक्यात

दुग्धजन्य पदार्थातुन विषबाधा झाल्याची शक्यता असुन, रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. घरोघरी तपासणी सुरु करण्यात आली आहे. तर बांधीतांवर उपचार सुरु असुन, रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे.
रणजित पाटील
(समुह आरोग्य अधिकारी परिते उपकेंद्र)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news