कोल्‍हापूर : जनतेच्या आग्रहामुळे निवडणूक लढवताेय : शाहू महाराज

शाहू महाराज
शाहू महाराज

कोल्‍हापूर ; पुढारी ऑनलाईन जनतेच्या आग्रहास्‍तव मी निवडणूक लढवत आहे. कोल्‍हापूरच्या विकासाला गती देण्याच काम करणार आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांचा समतेचा विचार महत्‍वाचा असून पुरोगामी विचारांच्या लोकांनी आज एकत्र येण्याची गरज निर्माण झाल्‍याचं शाहू महाराज यांनी सांगितल. काल काँग्रेसकडून शाहू महाराज यांना कोल्‍हापूर लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्‍या पार्श्वभूमीवर आज न्यू पॅलेस येथे शाहू महाराज यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्‍यांनी मविआतील नेत्‍यांचे उमेदवारी दिल्‍याबद्दल आभार मानले.

शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा माझ्यावर प्रभाव आहे. आज पुरोगामी विचा रांच्या लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे. आधी सक्रीय राजकारणात येण्याची आवश्यकता वाटली नाही, मात्र महाराजांनी लक्ष घालावं अशी हीच वेळ असल्‍याचं जनतेला वाटलं, त्‍यामुळे मी ही निवडणूक लढवत असल्‍याचं शाहू महाराज म्‍हणाले.

काँग्रेसच्या ७५ वर्षाच्या कामाच्या जोरावरच आजच्या विकासाच चित्र आपल्‍याला दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १० वर्षातील कामाला कमी लेखून चालणार नाही , पण मोदींच्या राजकारणाची दिशा सुधारायला हवी होती असे मत त्‍यांनी व्यक्‍त केले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news