कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आज (दि.२४) सकाळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची गुवाहाटी येथे भेट घेवून पाठिंबा दर्शविला. कोल्हापुरातील कट्टर शिवसैनिक असणारे राजेश क्षीरसागर शिंदे गटात सामील झाले आहेत. तर कोल्हापुरातील शिवसेना शहर कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी क्षीरसागर यांच्या पाठिशी आहेत.
आज सकाळी शिवालय कार्यालय येथे दंगा झाल्याची अफवा पसरली होती. यावर शिवसेना शहर कार्यकारणीतील सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी शिवालय येथे एकवटले. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शिवालय येथे मोठा पोलीस बंदोबस्तासह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ठाण मांडून राजेश क्षीरसागर यांना पाठिंबा दर्शविला. आज सकाळपासून शिवसेना शहर कार्यकारणीतील उपशहरप्रमुख, विभाग प्रमुख, शाखाप्रमुख, महिला आघाडी पदाधिकारी हे शिवालय या शिवसेना कार्यालयात तळ ठोकून आहेत.
हेही वाचलंत का ?