KL Rahul Athiya Shetty : मुलीच्या लग्नानंतर सुनील शेट्टीची भावूक पोस्ट, “कोणतेही नाते…”

KL Rahul Athiya Shetty : मुलीच्या लग्नानंतर सुनील शेट्टीची भावूक पोस्ट, “कोणतेही नाते…”

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेटर आणि बॉलीवुड अभिनेत्री अथिया शेट्टी हे सोमवारी विवाहबद्ध झाले. त्यांचा विवाह खंडाळा येथील घरी पार पडला. यानंतर  सुनील शेट्टीने आपली कन्या अथिया आणि जावाई के. एल. राहुल यांच्याबाबत एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. सुनील शेट्टीने लग्नातील फोटो शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत. (KL Rahul Athiya Shetty)

राहुल-अथियाबाबत सुनील शेट्टीची पोस्ट (KL Rahul Athiya Shetty)

सुनील शेट्टीने इन्स्टाग्राम पोस्टमध्‍ये म्‍हटलं आहे की, प्रेम आणि विश्वासाबरोबरच योग्य माणसाबरोबर विवाह करणे. नेहमी योग्य असते. कोणतेही नाते प्रेम आणि विश्वासानेच घट्ट होते. तुम्हा दोघांना खुप साऱ्या शुभेच्छा..! (KL Rahul Athiya Shetty)

सप्तपदी घेताना फोटो केले शेअर (KL Rahul Athiya Shetty)

राहुल-अथियाबाबत भावनिक पोस्ट शेअर करताना सुनील शेट्टीने त्यांचे सप्तपदी घेतानाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अथिया के.एल. राहुलचा हात पकडत मागे उभारलेली दिसत आहे. या फोटोमध्ये दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे. सुनील शेट्टीच्या पोस्टवर अथियानेही पोस्ट केली आहे. तिने प्रतिक्रिया देताना 'लव यू' असे लिहिले आहे. (KL Rahul Athiya Shetty)

विवाहानंतर अथियाची पहिली पोस्ट व्हायरल (KL Rahul Athiya Shetty)

के.एल.राहुलशी विवाह केल्यानंतर अथिया शेट्टीनेही एक पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट व्हायरल देखील झाली. अथियाने विवाहाचे फोटो शेअर करत इन्स्टाग्रामवर लिहिले आहे की, "तुमच्यासोबत राहूनच मी प्रेम करायला शिकले. आम्ही दोघे आमच्या घरीच विवाहबद्ध झालो हे सांगताना मला आनंद होत आहे. तुमचे प्रेमाने आणि आशीर्वादाने आम्ही भारावून गेलो आहोत. तुमचे आशीर्वाद नेहमीच आमच्या सोबत राहुद्यात. (KL Rahul Athiya Shetty)

 

View this post on Instagram

 

A post shared by KL Rahul? (@klrahul)

हेही वाचंलत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news