ठाकरेंच्या निकटवर्तीयांना राजकीय पाठबळ, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

File Photo
File Photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पार्टनरचे कसाबशी संबंध होते, असा गंभीर आरोप आज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य करताना यशवंत जाधव, हसन मुश्रीफ, विमल अग्रवाल यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत.

ठाकरेंचे निकटवर्तीय असणारे यशवंत जाधव यांची एक हजार कोटींची काळी संपत्ती असून त्यांना राजकीय पाठबळ मिळत आहे, तसेच उद्धव ठाकरेंचे मेहुणे पाठणकर यांचे निकटवर्तीय असणारे विमल अग्रवाल यांनी बुलेटफ्रुफ जॅकेट बनवताना मोठा घोटाळा केला असल्याचा आरोपही सोमय्या यांनी यावेळी केला. अग्रवाल यांच्या बोगस बुलेटफ्रुफ जॅकेटमुळेच करकरेंचा जीव गेला असल्याचे त्यांनी नमूद करत बेनामी संपत्ती प्रकरणी हसन मुश्रीफ यांच्यावर कारवाई सुरु असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news