‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची निर्मिती पुरुषांसाठी केली होती : केदार शिंदे

बाईपण भारी देवा
बाईपण भारी देवा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाची निर्मिती पुरूषांसाठी केली आहे. कारण महिलांच्या भावविश्वाची, मानसिक घालमेल पुरूषांना समजली तर अनेक महिलांच्या जीवनात सुख, आनंद भरभरून जाईल. आजवर अनेक सिनेमे निर्मिती व दिग्दर्शित केले पण विनोदाच्या चौकटीबाहेर जाऊन महिलांच्या विश्वाची वेगळी कथा मांडणाऱ्या 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाने मलाही वेगळी ओळख करून दिली. या चित्रपटाचे यश आनंददायी आहे, अशी प्रतिक्रिया दिग्दर्शक केदार शिंदे यांनी व्यक्त केली. ते 'बाईपण भारी देवा' चित्रपटाविषयी कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि केदार शिंदे दिग्दर्शित हा चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास २४ दिवस झाले आहेत. तरीदेखील प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयीचा उत्साह तसूभरही कमी झालेला दिसत नाही. आणि याच अपेक्षेवर खरं उतरत या चित्रपटाने केवळ २४ दिवसांत केलेली ६५.६१ कोटींची कमाई केली आहे. आणि हे चित्र पाहता या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीला आलेली मरगळ झटकून फेकून दिलीय अशी चर्चा रंगलेली दिसत आहे. आता या टीमने कोल्हापूर दौरा केला असून महालक्ष्मी मंदिर, महिला बचत गट, सिनेमागृह प्रेक्षक व पत्रकारांना भेटून या उज्ज्वल यशाबद्दल धन्यवाद दिले आहेत. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर व जियो स्टेडिओचे निखिल साने आवर्जून उपस्थित होते.

या चित्रपटानं पहिल्या आठवड्यात १२.५० कोटींचा गल्ला जमवला होता, दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर आपली हुकमत कायम ठेवत २४.८५ कोटींची कमाई केली, त्याच प्रमाणे तिसऱ्या तिसऱ्या आठवड्यात ही बाजी मारत २१. २४ कोटींची कमाई केली आहे. आणि आतापर्यंत फक्त २४ दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एकूण ६५.६१ कोटींचा पल्ला गाठला आहे. प्रदर्शनानंतर 'बाईपण भारी देवा' नं नवनवीन रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवले आहेत. आणि सिनेमागृहात ओसांडून वाहणारी प्रेक्षकांची गर्दी बघता ही आकडेवारी अजून मोठी झेप घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. असेही ते म्हणाले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news