आपल्याकडे इंधन दरवाढीचा आगडोंब थांबेना, पण कझाकिस्तानमध्ये त्याच कारणाने सरकार पडले !

आपल्याकडे इंधन दरवाढीचा आगडोंब थांबेना, पण कझाकिस्तानमध्ये त्याच कारणाने सरकार पडले !

Published on

अल्माटी; पुढारी ऑनलाईन

कझाकस्तान (kazakhstan protest) या मध्य आशियाई देशात, गॅसच्या वाढत्या किमतींवरून हिंसक सार्वजनिक निदर्शने सुरू झाल्यानंतर सरकारने राजीनामा दिला आहे. कझाकस्तानचे राष्ट्राध्यक्ष कासेम झोमार्ट यांनी पंतप्रधान अस्कर मामिन यांचा राजीनामा स्वीकारला आहे. दरम्यान, राष्ट्रपतींनी देशातील सर्वात मोठे शहर अल्माटी आणि पश्चिम मंगिस्टाउ प्रांतात दोन आठवड्यांसाठी आणीबाणी जाहीर केली आहे. (kazakhstan protest)

या आपत्कालीन परिस्थितीत रात्री ११ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली असून वाहनांच्या हालचालींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. एवढेच नाही तर लोकांच्या मोठ्या प्रमाणात एकत्र येण्यासही बंदी घालण्यात आली आहे. राष्ट्रपतींनी त्यांच्या व्हिडिओ संदेशात म्हटले आहे की, सरकार आणि लष्करावर हल्ला पुकारणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. सरकार पडणार नाही पण आम्हाला परस्पर विश्वास आणि संवाद हवा आहे, वाद नको.

समायलोव्ह अलीखान यांची काळजीवाहू पंतप्रधान म्हणून नियुक्ती

राष्ट्रपती हे विधान करत असताना अल्माटीमध्ये पोलिसांनी आंदोलकांवर अश्रुधुराचा मारा आणि हातबॉम्ब सोडले. हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या आंदोलकांना महापौर कार्यालयात प्रवेश करण्यापासून रोखण्याचा पोलिसांचा प्रयत्न होता. या तेलसंपन्न देशात, सरकारने मंगळवारी उशिरा घोषणा केली की ते एलपीजीच्या किमती पूर्ववत करत आहेत. तत्पूर्वी, नवीन वर्षाच्या दिवशी अशा प्रकारच्या दुर्मिळ प्रदर्शनात, एलपीजीच्या किमती वाढल्यानंतर आंदोलक अल्माटी शहरात पोहोचले.

या निदर्शनांनंतर सरकारने राजीनामा दिला असून राष्ट्रपतींनी संविधानाच्या कलम ७० अन्वये हा राजीनामा स्वीकारला आहे. कझाकिस्तानची आर्थिक राजधानी अल्माटी असून मंगळवारी रात्री तेथील परिस्थिती अनियंत्रित झाली. अस्कर मामीन यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रपतींनी समायलोव अलीखान यांची देशाचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली आहे. नवे सरकार स्थापन होईपर्यंत विद्यमान सरकारमधील सदस्य आपले काम करत राहतील, असे या आदेशात म्हटले आहे.

हे ही वाचलं का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news