Merry Christmas : ”मेरी क्रिसमस’ मध्ये कॅटरिना कैफकडून निराशा?’

Merry Christmas
Merry Christmas

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता कॅटरिना कैफ ही अभिजात सौंदर्य लाभलेली गुणवान अभिनेत्री, आजवरच्या कारकिर्दीत उत्तम यश संपादन केले, यामागे तिने घेतलेली मेहनत तितकीच कारणीभूत आहे. हिंदीचे उच्चारही नीट घेत नव्हते, त्या स्थितीपासून केलेल्या प्रवासात आजतागायत तिने जे अफाट यश मिळवले, ते अर्थातच लक्षवेधी आहे. 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटात मात्र तिला उंचावलेल्या अपेक्षा पूर्ण करता आलेल्या नाहीत, असेच प्रातिनिधिक चित्र आहे. ( Merry Christmas )

संबंधित बातम्या 

मुंबईला ज्यावेळी बंबई असे म्हटले जायचे, त्यावेळेपासूनचे कथानक 'मेरी क्रिसमस' ( Merry Christmas ) या चित्रपटात साकारले गेले आहे. या चित्रपटात अल्बर्टची भूमिका साकारणाऱ्या विजय सेतूपतीने आपल्या व्यक्तिरेखेला उत्तम न्याय दिला आहे. दुबईत राहिल्यानंतर तो सात वर्षांनी मायभूमीत परततो, असे त्यात दर्शवले गेले आहे. पण, प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी आहे. अल्बर्टची भेट मारियाशी होते आणि मारिया अल्बर्टला घेऊन आपल्या घरी जाते. त्यानंतर या चित्रपटात बरेच द्विस्ट व टर्न येतात आणि मर्डर मिस्ट्री सुरू होते.

पण, या सर्वात कॅटरिना कैफकडून निराशा झाल्याने चाहत्यांसाठी हा खरा धक्का ठरतो आहे. संजय कपूर व विनय पाठक यांना कमी स्क्रीन स्पेस असतानाही त्यांनी आपल्या भूमिकेला चोख न्याय दिल्याचे चित्र आहे. श्रीराम राघवन यांना वेगळ्या घाटणीचे चित्रपट देण्यासाठी ओळखले जाते. पण, यावेळी तेही अपेक्षा पूर्ण करू शकले नाहीत, असा सूर आहे.

कॅटरिनाकडून या चित्रपटात बऱ्याच अपेक्षा असणे साहजिकच होते. मात्र, त्यात ती खरी उतरली नसल्याने चाहत्यांमधूनही अपेक्षापूर्ती झाली नसल्याचे चित्र आहे. या विकेंडमध्ये हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कसे प्रदर्शन साकारणार, यावरदेखील बरीच समीकरणे अवलंबून असणार आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news