नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (Karnataka Election) काँग्रेसच्या अभूतपूर्व विजयामुळे पुढील वर्षी राज्यात रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या ४ जागांपैकी ३ जागा जिंकण्यात पक्षाला मदत होण्याची शक्यता आहे. राज्यातील ४ राज्यसभा सदस्य सय्यद नासिर हुसेन, जीसी चंद्रशेखर आणि काँग्रेसचे एल हनुमंथय्या आणि भाजपचे केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचा कार्यकाळ २०२४ मध्ये संपत आहे.
(Karnataka Election) कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने एकूण २२४ जागांपैकी ६६ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे भाजप पुढील वर्षी राज्यसभेवर आपला एक उमेदवार पाठवू शकेल. भाजपकडे सध्या कर्नाटकमधून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह ६ राज्यसभा सदस्य आहेत. राज्यातील १२ राज्यसभेच्या जागांपैकी काँग्रेसकडे ५ आणि जनता दल (सेक्युलर) १ जागा आहे.
माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा हे राज्यसभेतील जनता दलाचे (धर्मनिरपेक्ष) एकमेव सदस्य आहेत. देवेगौडा आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा कार्यकाळ २०२६ मध्ये भाजपच्या इराणा कडाली आणि नारायण कोरगप्पा यांच्यासोबत संपणार आहे. सीतारामन यांच्यासह इतर ४ सदस्यांचा कार्यकाळ २०२८ मध्ये संपणार आहे.
२२४ सदस्यीय कर्नाटक विधानसभेसाठी शनिवारी झालेल्या मतमोजणीत काँग्रेसने सरकार स्थापनेसाठी आवश्यक ११३ जागांचा जादुई आकडा पार केला आहे. राज्यात काँग्रेसला १३५ तर जेडीएसला १९ जागा मिळाल्या आहेत.
हेही वाचा :