शेळगाव; पुढारी वृत्तसेवा : सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ओबीसी सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मंगळवारी (दि. १६) मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
याप्रसंगी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश सरचिटणीस अदिती नलावडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, प्रदेश उपाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, सावता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष मयूर वैद्य, प्रदेश उपाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, महासचिव गणेश दळवी, प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण गाडेकर, मुख्यप्रदेश संघटक संतोष राजगुरू, प्रदेश सचिव शरद माने आदींसह महाराष्ट्रातील संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
कल्याण आखाडे यांच्या निवडीनंतर सावता परिषदेच्या वतीने महाराष्ट्रभर तसेच इंदापूर तालुक्यात ठिकठिकाणी पेढे वाटून तसेच फटाके, तोफा वाजवून सावता परिषदेचे इंदापूर तालुकाध्यक्ष प्रकाश नेवसे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल ननवरे, युवक तालुकाध्यक्ष अमर बोराटे, तालुका कार्याध्यक्ष विष्णू झगडे, सुहास बोराटे, सचिन शिंदे यांनी आनंदोत्सव साजरा केला.