पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेटपटू के. एल. राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीचे ( KL Rahul-Athiya ) लग्न २३ जानेवारी २०२३ रोजी मोठ्या धुमधडाक्यात पार पडले. या विवाहाला मोजकेच नातेवाईक आणि मित्रमंडळींनी हजेरी लावली होती. या विवाहादरम्यान अथियाचे वडिल सुनिल शेट्टींनी कोणत्याही प्रकारची गर्दी किंवा आधीच विवाहाचे फोटो व्हायरल होणार यांची दक्षता घेतली होती. विवाहानंतर दोन दिवसांत मुंबईत रिसेप्शन पार्टीचे आयोजन केलं आहे. याच दरम्यान या कपलने लग्नातील हळदीच्या कार्यक्रमाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोत खास करून राहुलची 'कुर्ता फाड' हळदीचा विधी पार पडल्याची झलक पाहायला मिळाली आहे.
के. एल. राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी ( KL Rahul-Athiya ) दोघांनी त्याच्या इन्स्टाग्रामवर हळदीचे काही फोटो काही फोटो शेअर केले आहेत. यावेळी डिझायनर ऋतु कुमार यांनी डिझाईन केलेला ग्रे- स्पिच कलरचा घाघरा अथियाने परिधान केला होता. तर राहुल स्पिच कलरच्या शेरवानीत हॅंडसम दिसला आहे. अथियाचा हा अनारकली ड्रेसवर गोल्डन गोटा वर्क बनवण्यासाठी दीर्घकाळ लागला आहेत. या फोटोत दोघेजण एकमेंकाना हळद लावताना दिसत आहेत.
या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी 'सुख ☀️' असे लिहिले आहे. यातील खास म्हणजे, एका फोटोत राहूलला हळद लावताना त्याचा कुर्ता फाडल्याचे दिसत आहे. तर काही फोटोत नातेवाईक-मित्रमंडळी तर काही फोटोत अथिया- राहुल दोघेजण एकमेंकांना हळद लावताना दिसत आहेत.
मुलगी अथियाच्या लग्नानंतर बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी यांनी माध्यमांना मिठाई वाटून या विवाहाची माहिती दिली होती. अथिया- राहुल गेल्या काही दिवसांनंतर एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होते. यानंतर दोघांनी मोजकेच १०० लोकांच्या उपस्थित लग्नगाठ बांधली.
हेही वाचा :