पुढारी ऑनलाइन डेस्क : Job & Career : ॲपल ही जागतिक स्तरावरील सर्वात टॉप टेक कंपन्यांपैकी एक. सर्जनशीलता आणि नाविन्य चाकोरीबाहेर विचार करून तो अस्तित्वात आणून तो लोकांमध्ये रुजवण्यासाठी मेहनत घेण्याची तयारी अशा गुणांमुळे ॲपलने खूप कमी काळात खूप मोठी मजल गाठली. अशा जागतिक स्तरावरील टॉप कंपनीत काम करण्याची कोणाची इच्छा नसेल? तुम्हाला देखील ॲपलमध्ये काम करायचे आहेत का? तर मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची. कारण ॲपलचे सीईओ टिम कूक यांनीच ॲपलमध्ये काम करण्यासाठी तुमच्याकडे कोणते गुणवैशिष्ट्ये असायला हवी याचा खुलासा केला आहे.
Job & Career : CNBC ने दिलेल्या माहितीप्रमाणे एका इटालियन विद्यापीठाच्या प्रारंभ समारंभात नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत, कुक यांनी Apple च्या यशाबद्दल बोलताना कंपनीच्या कर्मचा-यांमध्ये आवश्यक गुण वैशिष्ट्यांबाबत सांगितले. त्यांनी ॲपलचे यश थेट त्याच्या संस्कृतीशी जोडले आणि त्याप्रमाणेच ते उमेदवारांमध्ये गुण शोधतात.
Job & Career याबाबत बोलताना कुक म्हणाले, सहकार्याने काम करणे, कल्पना शेअर करणे, सर्जनशीलता आणि कुतूहल ही चार वैशिष्ट्ये तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.
कुक यांचे म्हणणे आहे की ॲपलने आतापर्यंत एकत्रित रित्या प्रयत्न करून आपली उत्पादने निर्माण केली आहे. त्यामुळे प्रत्येकाने सहकार्याने काम करणे महत्त्वाचे आहे.
तसेच "आम्ही मूलभूत भावना शोधत आहोत की जर मी माझी कल्पना तुमच्याशी शेअर केली तर ती कल्पना वाढेल आणि मोठी होईल आणि अधिक चांगली होईल," कुकने प्रकाशनाद्वारे उद्धृत केले.
Job & Career तर सर्जनशीलता आणि कुतूहलता या अन्य दोन गोष्टींबद्दल बोलताना कुक म्हणाले की, कंपनी वेगळ्या पद्धतीने विचार करणाऱ्या लोकांना शोधते. "आम्ही अशा लोकांचा शोध घेतो जे भिन्न विचार करतात . जे एखाद्या समस्येकडे पाहू शकतात आणि ती समस्या नेहमी [निराकरण] कशी केली जाते या कल्पनेत अडकत नाही," त्याने स्पष्ट केले.
कुतूहलाबद्दल विचाराल तर कुक म्हणाला की त्याला लहान मुलासारखे प्रश्न विचारणारे लोक आवडतात. "हे एक क्लिच आहे, परंतु कोणतेही मुक प्रश्न नाहीत," तो म्हणाला.
Job & Careerकर्मचार्यांमध्ये ही 4 वैशिष्ट्ये असतील तर निश्चितच "एक महत्वाकांक्षी, तरीही समर्थन देणारी" कार्य संस्कृती तयार होते, असा विश्वास सीईओ टिम कूक यांना आहे.
तंत्र विश्वात कार्यरत असणा-या प्रत्येकाला ॲपल सारख्या कंपनीत एकदा तरी काम करण्याची इच्छा असतेच. मग जर तुम्हाला भविष्यात ॲपल कंपनीत नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला कुक यांनी सांगितलेले हे चार गुण निश्चितच स्वतःमध्ये विकसित करायला हवी.
हेही वाचा :