Manoj Jarange : लोकसभा निवडणुकीबाबत जरांगे पाटील यांची मोठी घोषणा; म्हणाले…

Manoj Jarange : लोकसभा निवडणुकीबाबत जरांगे पाटील यांची मोठी घोषणा; म्हणाले…

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा: माझ्याकडे आलेल्या अहवालावरून मला उमेदवार देता येणार नाही.मी या अहवालावर निर्णय घेऊ शकत नाही.यावर निर्णय घेतल्यास समाज मातीत जाईल. ज्याला पाडायचं त्याला पाडा,ज्याला निवडून द्यायचं त्याला द्या,जो सगे सोयरे कायद्याला पाठिंबा देईल त्याला मतदान करा बाकीच्यांना पाडा,विधानसभा निवडणुकीची तयारी करा,मला तुम्हाला आरक्षण देणारे बनवायचे असल्याचा निर्धार मनोज जरांगे यांनी व्यक्त केला.

ते अंतरवाली सराटीत मराठा समाजाने दिलेल्या अहवाला नंतर घेण्यात आलेल्या निर्णय बैठकीत बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, या अहवालावर निर्णय घेऊ शकत नाही, यावर निर्णय घेतल्यास समाज मातीत जाईल. राजकारणाने आपलं वाटोळं होईल,तुमच्या रक्तात आरक्षण भिनू द्या.राजकारण्यांच्या पंगती कधीपर्यंत वाढायच्या आहे.तुम्हाला राजकारण्यांचा विचार कधीपर्यंत करायचा आहे.?मग तुम्ही मोठे होणार कसे.आपल्यावरील अन्याय सांगणार कोण? असा सवाल ही मनोज जरांगे यांनी उपस्थित केला.

अनेक तालुक्यात मराठा समाजबांधवांनी परस्पर बैठका घेतल्या. या बैठकांची खेड्या पाड्यातील बांधवांना कुणालाही कल्पना नाही .आणि परस्पर उमेदवार निश्चित करून मला अहवाल दिला.हे बरोबर नाही.महाराष्ट्रात अनेक गावांत मराठा बांधव पोहचलेच नाही.आपल्या रक्तात राजकारणापेक्षा आरक्षण ठेवा,ज्यांच्यावर डाटा तयार करण्याची जबाबदारी दिली त्यांनी स्वतःच्याच उमेदवाराची नावे दिली.अहवाल तयार करताना काही जणांनी मनमानी केली.सह्या देखील स्वतःच्या ठोकल्या.राजकारण हे समाजापेक्षा मोठं नाही.राजकारणापायी मी समाजाच वाटोळं होऊ देणार नसल्याचा निर्वाळा त्यांनी व्यक्त केला.

आपल्याला राजकारणापेक्षा आरक्षण महत्वाचं आहे. आपला सात महिन्याचा आरक्षणाचा लढा आपण विसरून अलीकडच्या ६ दिवसात आरक्षण विषयापेक्षा राजकारणाच जास्त झालं आहे.राजकारण करू नका या मताचा मि नाही.पण आरक्षण विषय बाजूला जाऊ देऊ नका.मि मराठयांना आरक्षण मिळवून देण्यास खंबीर असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मि राजकारणात असलो काय आणि नसलो काय माझ्यात मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा दम आहे.येणाऱ्या काळात जर सग्या-सोयऱ्याची अंमलबजावणी झाली नाही तर विधानसभा निवडणुकीत धिंगाणाच करायचा असा सरकारला इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

आचारसंहिता उठल्यावर जून महिन्यात ९०० एकरावर मराठ्यांची बिड जिल्हयातील नारायणगड येथे सभा होणार आहे.तिथे आरोग्य, पाणी जेवण,अशी तात्पुरती सर्व व्यवस्था केली जाईल. तिथे सभेला काहीही अडचण येणार नाही,

माझी जात हरु नये म्हणून लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे.अजून ६ महिन्याचा वेळ विधानसभा निवडणुकीला बाकी आहे.६ महिन्यात सगे सोयरे कायदा झाला नाही तर विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा.बाकी निर्णय समाजाने घ्यावा.मराठे निवडणूक कुणाला पाडतात याकडे आता राजकारण्यांचे लक्ष लागलंय.मराठे डोकं लाऊन या निवडणुकीत उमेदवारांना पाडणार असा इशारा त्यांनी यावेळी राजकारण्यांना दिला.

आया बहिणी च्या अंगावर वळ उमटले ते विसरू नका, अनेक जण जेलात गेले, अनेकांनी आपले अपघातात हातपाय गमावले, उन्हा तन्हात समाज रस्त्यावर आला त्याची जाण असली पाहिजे.मतदान करताना ते विसरू नका.

मराठ्याची ताकत दाखवून द्या.मी कुणाला मत द्या ते सांगणार नाही.मी कुन्याही जातीचा, पक्षाचा, उमेदवाराचा प्रचार करणार नाही.समाजाने ज्याला पडायचे त्याला पाडा.एका ही राजकीय सभेला जायचे नाही

आरक्षण आणि सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी दिली नाही तर त्यांना पाडा. आरक्षणासाठी जे बोलतील त्यांना निवडून द्या.ज्यांचे पडायचे त्यांचा धिंगाणा करा.

आपल्याला निवडणुकी पेक्षा आरक्षण महत्वाचे आहे.गेल्या दोन दिवसापासून फक्त राजकारणच चाललाय.पण राजकारणाच्या नादात आरक्षण मागे पडले नाही पाहिजे. राजकारण वाईट नाही,ते ही गरजेचे आहे. आपल्यावर अन्याय मिळवण्यासाठी ते ही करावे लागेल.राजकारण रक्तात असेल पाहिजे.तुमच्या राजकीय स्वार्था साठी जात मारायची नाही.
राजकारणात गेल्याशिवाय निर्णय होणार नाही ते मान्य आहे.पण सर्व सामान्य समाज बांधवांचे मत विचारात घेतले पाहिजे.समाजावर निर्णय लादला गेला तर तो ही अन्याय होतो.काही गावात बैठकाच झाल्या नाहीत आपण समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचलोच नाहीत.मग हा अहवाल तालुक्याच्या ठिकाणी बसून तयार जर झाला असेल तर ते समाजाचे म्हणने असे सयुक्तिक ठरणार नाही.विषय गंभीर असताना आपण बोगस सह्या करून अहवाल दिला तर ती समाजाची फसवणूक चालवली आहे.तुम्ही जातीत ही मनमानी चालवली आहे.आपला मतदार कोटीत आहे.मात्र निर्णय प्रक्रियेत त्या सर्वांना सामावून घेतले पाहिजे होते पण ते झाले नाही.

मराठा समाजाची आचारसंहिता

१)राजकीय सभेला जायचे नाही.
२)प्रचाराला जायचे नाही.
३)झेंडे लावायचे नाही.
४)जे करायचे ते ठरवून करू.
५)आरक्षणासाठी जे बोलतील त्यांना निवडून द्या.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news