Janhvi Kapoor : सिंपल लूकमध्ये जान्हवी तिरुपतीच्या दर्शनाला (video)

Janhvi Kapoor
Janhvi Kapoor

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने ( Janhvi Kapoor ) आंध्र प्रदेशमधील तिरुमाला येथील श्री. व्यंकटेश्वर स्वामी मंदिराला भेट दिली. यावेळी जान्हवीने सोनेरी कलरच्या सिपंल साडीत येथील मंदिरात जावून पुजा- अर्चना करत देवाचा आशिर्वाद घेतलाय. या वेळचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ( Janhvi Kapoor )

संबंधित बातम्या 

अभिनेत्री जान्हवी कपूर नुकताच आंध्र प्रदेशमधील तिरूपतीच्या दर्शनाला गेल्याचा एक व्हिडिओ एक्स (x) ट्विटरवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत अभिनेत्री जान्हवी कपूर, तिच्या बॉयफ्रेंड शिखर पहाडिया आणि बॉडीगार्डसह तिरूपती येथील श्री. व्यंकटेश्वर स्वामी मंदिर परिसरात दिसतेय. यावेळी तिने सोनेरी रंगाच्या साडीत सिंपल लूक कॅरी केलाय.

या लूकमध्ये जान्हवी खूपच ग्लॅमरस दिसतेय. भगवान व्यंकटेश्वराचे दर्शन घेवून तिने पुजा-अर्चना केली आहे. यावेळी जान्हवीसोबत तिचा बॉयफ्रेंड शिखर पहाडिया व्हाईट कलरचे धोती आणि उपरणमध्ये हॅडसम दिसला आहे. हा व्हिडिओ खूपच व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून चाहत्यांनी आगामी प्रोजेक्टसाठी देवाचे दर्शन घेवून आशिर्वाद घेतल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे नेटकऱ्यांनी तिच्या लूकचे कौतुक करताना भरभरून कौतुकाचा वर्षाव केलाय.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news