पुढारी ऑनलाइन डेस्क : जम्मू आणि काश्मीर : भारतीय लष्कराने काल रात्री उशिरा नौशेरा सेक्टरमध्ये एलओसीवर घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. J&K : Indian Army
क्वाडकॉप्टरच्या शोधात घुसखोरांचे दोन मृतदेह आढळून आले आहेत. घुसखोरीच्या प्रयत्न केलेल्या ठिकाणच्या सामान्य क्षेत्राची तपासणी सुरू आहे. क्षेत्र आणखी स्कॅन केले जात आहे, अशी माहिती पीआरओ संरक्षण, जम्मू ने दिली आहे.J&K : Indian Army
एलओसीवर भारतीय लष्कर सतत सतर्क असते. गेल्या काही दिवसांपासून घुसखोरी आणि दहशतवादी हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. त्या पार्श्वभूमिवर भारतीय सैन्याची ही कारवाई महत्वपूर्ण आहे. याबाबत सविस्तर वृत्त अजून आलेले नाही. लवकरच अधिक माहिती प्रसारित केली जाईल.