जळगांव : रावेर लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला; शरद पवार गटाकडून श्रीराम पाटील रिंगणात

जळगांव : रावेर लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला; शरद पवार गटाकडून श्रीराम पाटील रिंगणात

जळगांव; पुढारी वृत्तसेवा : जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभेसाठी महाविकास आघाडीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे गेलेली होती. बऱ्याच दिवसापासून अनेक उमेदवारांची नावे चर्चेत असतान शेवटी भाजपातून शरद पवार गटाकडे आलेले श्रीराम पाटील यांना उमेदवारी मिळाल्याचे खात्रीलायक वृत्त मिळाले आहे

भाजपाने आपले जळगाव लोकसभेतील दोन्ही उमेदवार जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडी च्या शरद पवार गटाकडून उमेदवारांची चाचणी करण्यात येत होती अनेक इच्छुक त्या ठिकाणी रांगेत असताना शरद पवार गटाने भाजपाच्या जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांना आपल्याकडून निवडणूक लढवण्यास तयार करण्याचा प्रयत्न केला त्यांनी नकार दिल्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील व भाजपा नुकतेच गेलेले उद्योजक श्रीराम पाटील यांचे नाव होते शेवटी उशिराने बारामती येथे झालेल्या बैठकीत श्रीराम पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी देण्यात आलेली आहे याची अधिकृत सूचना गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शरद पवार यांच्याकडून होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून रावेर लोकसभेमध्ये आपल्या संपर्क त्यांनी वाढवलेला होता त्यांनी आपल्या उद्योग मधून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे श्रीराम पाटील यांनी रक्षा खडसे यांच्या समोर एक कडवे आव्हान निर्माण केलेले आहेत लेवा पाटील विरुद्ध मराठा पाटील अशी ही लढत होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news