Jacqueline Fernandez
Jacqueline Fernandez

Jacqueline Fernandez : ‘तू तर जबडा तोडलास !’

पुढारी ऑनलाईन : रणवीर सिंहचा बहुचर्चित 'सर्कस' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाची संपूर्ण टीम प्रमोशनमध्ये व्यस्त होती. यादरम्यानच जॅकलीन फर्नाडिस हिने चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळीचा किस्सा सांगितला आहे.

जॅकलीनने सांगितले. की, चित्रपटाच्या एका सीनवेळी तिच्याकडून किती मोठी चूक झाली होती. यावर रणवीरने देखील भाष्य केले आहे. जॅकलीन म्हणाली, 'सर्कस' चित्रपटात एक सीन होता. ज्यामध्ये मला रणवीर आणि वरुण धवनच्या कानाखाली मारायची होती; मात्र हे सीन करताना मी खरोखरच विसरले की हा फक्त सीन आहे.

या सीनच्या वेळी मी इतकी जास्त नर्व्हस झाले होते की, मी खरोखरच त्यांना मारले. मला काहीच कळाले नाही. परंतु यादरम्यान मला वाटले की, मी बर्फच तोडला आहे. यावर रणवीरने मजेदार उत्तर 'दिले. तो म्हणाला की, 'हां, तू बर्फ नाही तर जबडा तोडला होतास ज्याच्यासाठी मला बर्फ हवा होता'.

logo
Pudhari News
pudhari.news