Israel Gaza war: विमानातून सोडलेली मदतीची खोकी अंगावर पडून पाचजणांचा मृत्यू

Israel Gaza war
Israel Gaza war

राफा : वृत्तसंस्था एकीकडे अन्नाविना मरण पावण्याची वेळ आलेली असतानाच, पाच पॅलेस्टिनींवर Israel Gaza war विमानातून टाकलेल्या मदतीची खोकी अंगावर पडून जीव गमावण्याची वेळ आली. या घटनेत दहाजण जखमी झाले.

इस्रायलच्या आक्रमणानंतर गाझातील पॅलेस्टिनींची अत्यंत दैन्यावस्था झाली असून, तेथे भूकबळी होण्याची स्थिती निर्माण झाल्याने अमेरिका व जॉर्डनने विमानातून अन्नधान्याची मदत पुरवणे सुरू केले आहे. Israel Gaza war ही विमाने गाझावर येतात व मदतीची खोकी पॅराशूट लावून खाली सोडतात. अल शाती या निर्वासित छावणीसाठी शुक्रवारी मदत पुरवणारे विमान आले व त्यांनी शेकडो खोकी खाली सोडली. ही खोकी मिळवण्यासाठी शेकडो लोक धावत सुटले. काही खोक्यांची पॅराशूट उघडलीच नाहीत; परिणामी ही खोकी अंगावर पडून त्यात ५ जण ठार झाले व १० जण जखमी झाले.

• गाझामध्ये विदारक स्थिती Israel Gaza war
विमान दिसताच मदत मिळविण्यासाठी शेकडो लोक धावत सुटले
१० जण गंभीर जखमी; तांत्रिक चुकीने घडली घटना

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news