IPL 2023 : ‘हा’ मोठा खेळाडू बनला मुंबई इंडियन्सचा सहाय्यक फलंदाजी प्रशिक्षक

IPL 2023 : ‘हा’ मोठा खेळाडू बनला मुंबई इंडियन्सचा सहाय्यक फलंदाजी प्रशिक्षक
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई इंडियन्सने आगामी आयपीएलच्या हंगामाची तयारी सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी कोचीमध्ये आयपीएल ऑक्शनचेही आयोजन करण्यात आले होते. या ऑक्शनमध्ये ८० खेळाडूंचा निलाव पार पडला. दरम्यान, मुंबई इंडियन्सने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पाच वेळेस जेतेपद पटकावणाऱ्या मुंबईने अरूण कुमार जगदीश यांची सहाय्यक फलंदाजी प्रशिक्षपदी नियुक्ती केली आहे. (IPL 2023)

यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी मार्क बाऊचर यांची निवड करण्यात आली होती. तर कायरन पोलार्डची फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई इंडियन्सचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून शेन बाँड तर क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून जेम्स पेंमेंट हे काम पाहणार आहेत. (IPL 2023)

अरूण कुमार जगदीश यांनी सलामीवीर फलंदाज म्हणून आपली कारकिर्द सुरू केली होती. त्यांनी १०० पेक्षा अधीक प्रथम श्रेणी सामने खेळले असून ७२०८ धावा केल्या आहेत. अरूण कुमार यांनी १९९३ ते २००८ पर्यंत कर्नाटक क्रिकेट संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे.

क्रिकेमधून निवृत्त घेतल्यानंतर प्रशिक्षक म्हणून अनेक वर्ष काम पाहिले. अरूण कुमार हे कर्नाटक संघाचे फलंदाजी प्रशिक्षक होते. ते प्रशिक्षक असतानाच कर्नाटकच्या संघाने २०१३-१४ आणि २०१४-१५ मध्ये रणजी ट्रॉफी, इराणी कप आणि विजय हजारे ट्रॉफी आपल्या नावावर केली होती. (IPL 2023)

शिवाय अरूण कुमार यांनी आयपीएलमध्येही प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. त्यांनी २०१७ मध्ये किंग्ज इलेवन पंजाबचे (सध्याचा पंजाब किंग्ज) फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले होते. अरूण कुमार हे २०२० पासून डिसेंबर २०२२ पर्यंत अमेरिकेच्या पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. (IPL 2023)

हेही वाचंलत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news