पुढारी ऑनलाइन डेस्क : Instagram New Feature इन्स्टाग्राम हा सोशल मीडियावरील एक मोठा प्लॅटफॉर्म आहे. लोकांना आपले आनंदाचे क्षण फोटो फिचर इन्स्टावर शेअर करायला खूप आवडते. सुरुवातीला इन्स्टाग्राम हे फोटो शेअर करण्यासाठीचे अॅप म्हणून खूप लोकप्रिय झाले. नंतर त्यामध्ये वेगवेगळे फिचर्स वाढत गेले. तसेच इन्स्टाग्राम आता पुन्हा आपले फिचर्स अपडेट करत आहे.
Instagram New Feature इंस्टाग्रामचे नवीन फीचर आता सिंगल स्टोरी पोस्टमधील व्हिडिओ मर्यादा वाढवेल. यामध्ये आता तुम्ही 60- सेकंदपर्यंतची स्टोरी पोस्ट करू शकतो. आतापर्यंत इन्स्टाग्रामच्या एका स्लाइडमध्ये व्हिडिओ स्टोरी पोस्ट करताना फक्त 15 सेकंदाच्या मिनी क्लिप तुम्ही शेअर करू शकत होता. इन्स्टाग्राम आता याच फिचरमध्ये नवीन अपडेट्स घेऊन येत आहे. आता इन्स्टाच्या सिंगल स्टोरीजममध्ये तुम्ही 60 सेकंदापर्यंतचे स्टोरीज प्ले तयार करू शकता, अशी माहिती इन्स्टाग्रामच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.
Instagram New Feature लहान व्हिडिओ अॅप TikTok ला टक्कर देण्यासाठी Instagram अॅपला अधिक आकर्षक आणि परस्परसंवादी ठेवण्यासाठी नवीन वैशिष्ट्ये सादर करत आहे. नवीन अपडेट कोणत्याही अडथळ्याशिवाय मोठे व्हिडिओ अपलोड करू इच्छिणाऱ्या निर्मात्यांसाठी उपयुक्त ठरेल. पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ज्यांना सतत टॅप करावे लागते त्यांच्यासाठी देखील हे उपयुक्त ठरेल.
मात्र या फिचरमुळे इन्स्टा वापरकर्त्यांना पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी एक मिनिट इतका वेळ थांबावे लागले. कारण या फिचरमध्ये अद्यापतरी प्लेबॅकची सुविधा देण्यात आलेली नाही. तसेच यामुळे रील्स आणि सिंगल स्टोरीमधील अंतर कमी होणार आहे. इन्स्टाने अलीकडेच रील्सची लाबी 60 सेकंदावरून 90 सेकंदांपर्यंत वाढवली आहे. त्याचप्रमाणे इन्स्टा नवीन स्टोरी लेआउटची देखिल चाचणी करत आहे. त्यामुळे हे नवीन फिचर्स खूप सा-या पोस्ट लपवेल. सध्या इन्स्टा वापरकर्ते 100 कथा पोस्ट करू शकतात. नवीन फीचर्सनुसार कथा सामायिकरण संख्या समान असते. मात्र बाकीच्या कथा पाहण्यासाठी 'सर्व दर्शवा' हे बटण दिसेल.
Instagram New Feature इनस्टाग्राम हे दिवसेंदिवस त्याच्या नवीन अपडेटेड फिचर्ससह व्हिडिओ केंद्रीत अॅप होत आहे. यासाठी इन्स्टाचे प्रमुख अॅडम मोसेरी म्हणाले की ते व्हिडिओला अधिकाधिक प्राधान्य देत आहे. कारण त्यांना Tik Tok कडून कठोर स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे. मात्र, यामुळे इनस्टाचे पूर्वीचे वापरकर्ते ज्यांना इन्स्टा हे अजूनही फक्त फोटो शेअरिंगसाठीचे अॅप म्हणून इन्स्टाकडे पाहतात. त्यांची इच्छा आहे इन्स्टा फक्त फोटोकेंद्रित अॅप असायला हवे. व्हिडिओ केंद्रित नसावे. परिणामी याबाबत इन्स्टाग्रामला तीव्र प्रतिक्रियांचा सामना करावा लागत आहे.