India Canada Visa : भारत-कॅनडा व्हिसा सेवा पूर्ववत हाेईल : परराष्‍ट्र मंत्री एस. जयशंकर

India Canada Visa : भारत-कॅनडा व्हिसा सेवा पूर्ववत हाेईल : परराष्‍ट्र मंत्री एस. जयशंकर

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि कॅनडा दोन देशांमधील व्हिसा सेवा पूर्ववत हाेईल, अशी माहिती आज (दि.२२) परराष्ट्रमंत्री एस.  जयशंकर यांनी दिली. खलिस्‍तानी दहशतवादी निज्‍जर याची कॅनडामध्‍ये जून महिन्‍यात हत्‍या झाली हाेती. या प्रकरणी कॅनडाच्‍या पंतप्रधान जस्‍टीन ट्रुडाे यांनी भारतावर आराेप केले हाेते. यानंतर दाेन्‍ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले. यानंतर भारताने व्हिसा सेवा स्‍थगित करण्‍याचा निर्णय घेतला हाेता. आता ही सेवा पुन्‍हा पूर्ववत हाेणार असल्‍याने उभय देशांमधील संंबंध पुन्‍हा सुधारतील अशी शक्‍यता व्‍यक्‍त हाेत आहे.

जून महिन्‍यात खलिस्‍तानी दहशतवादी निज्‍जर याची गाोळ्या झाडून हत्‍या झाली. या प्रकरणी कॅनडाने काेणतेही ठाेस पुरावे सादर न करता थेट भारतावर आराेप केले. यामुळे दोन्ही देशांदरम्यानच्या व्हिसा सेवेवर मोठा परिणाम झाला. आज (दि. २२) परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी ही व्हीसा सेवा पुन्हा पूर्ववत करण्यात येईल, अशी माहिती दिली आहे

राजकीय वादाच्या दरम्यान भारत आणि कॅनडामधील कमी झालेल्या व्हिसा सेवांबद्दल बोलताना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आज (दि. २२) सांगितले की, जर भारतीय राजनैतिकांना व्हिएन्ना करारानुसार कॅनडामध्ये सुरक्षा प्रदान केली गेली तर व्हिसा सेवा पूर्ववत करता येईल".

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news