अरविंद केजरीवाल यांना गुरुवार,२१ मार्च राेजी अटक केली हाेती.
अरविंद केजरीवाल यांना गुरुवार,२१ मार्च राेजी अटक केली हाेती.

Arvind Kejriwal Arrest : केजरीवाल प्रकरणात भारताने जर्मनीला फटकारले

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेबाबत जर्मनीने केलेल्या टिप्पणीवरून भारतात संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. या प्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाने जर्मन वकिलातीचे उपप्रमुख जॉर्ज एन्झ्वेलर यांना भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पाचारण केले आणि जर्मनीची टिप्पणी भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ असल्याची खरमरीत शब्दांत समज देऊन निषेध नोंदवला. Arvind Kejriwal Arrest
दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्यानंतर जर्मनीने यावर टिप्पणी करताना म्हटले होते की, जर्मन सरकारने या घटनेची दखल घेतली आहे. भारत हा लोकशाही देश आहे आणि  न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याशी संबंधित मानके, मूलभूत लोकशाही तत्त्वे या प्रकरणात देखील लागू होतील. केजरीवाल यांना निष्पक्ष खटला चालवण्याचा अधिकार आहे, असेही जर्मनीने म्हटले होते. यावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने जर्मन दूतावासाचे उपप्रमुख जॉर्ज एन्झ्वेलर यांना बोलावून जर्मनीच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त केला. Arvind Kejriwal Arrest
आमच्या न्यायिक प्रक्रियेत हस्तक्षेप करणारे आणि आमच्या न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य कमी करणारे असे वक्तव्य केले आहे. भारत हा कायद्याचे राज्य असलेला एक दोलायमान आणि मजबूत लोकशाही देश आहे. देशातील सर्व कायदेशीर प्रकरणामध्ये कायद्यानुसार निर्णय घेतला जात आहे. या प्रकरणात पक्षपाती गृहितक अवास्तव आहे, असेही भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
दरम्यान, मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले अरविंद केजरीवाल यांना २८ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. आता केजरीवाल यांना २८ मार्च रोजी दुपारी २ वाजता न्यायालयात हजर केले जाणार आहे.
हेही वाचा 
logo
Pudhari News
pudhari.news