पुढारी ऑनलाईन डेस्क : निखत झरीनने कॉमनवेल्थ २०२२ मध्ये महिलांच्या ४८-५० किलो वजनी बॉक्सिंग गटात सुवर्णपदक पटकावले. तिने एम. सी. मॅकनॉलचा पराभव करत सुवर्णपदक आपल्या नाव काेरले.
पहिल्या राऊंडमध्ये निखत झरीनने ५-० ने आघाडी घेतली आहे. निखतने इंग्लंडच्या अल्फिया सव्वानाचा सेमिफायनलमध्ये पराभव करत फायनलमध्ये धडक मारली होती. दुसऱ्या राऊंडमध्येही निखतने आघाडी घेतली आहे. अखेर तिसर्या राऊंड तिने आघाडी कायम ठेवत आज भारताला या स्पर्धेत तिसरे सुवर्णपदक पटकावले.
फायनलमध्ये निखत जरीनचा नॉर्दन आर्यलंडच्या कार्ली मॅकनॉलबरोबर मुकाबला होता. पहिल्याच राउंडमध्ये निखतने अपेक्षेप्रमाणे आक्रमक खेळ करत आघाडी घेतली. पहिला राउंड ५-० जिंकल्यानंतर सामन्यात तिने पुन्हा मागे पाहिले नाही. पुढील दोन राउंडमध्येही तिने ही आघाडी कायम ठेवत सुवर्ण पदक आपल्या नावावर केले. २६ वर्षीय निखत झरीनने मे महिन्यामध्येचं वर्ड चॅम्पियन बनली होती. निखतच्या या कामगिरीमुळे भारताने राष्ट्रकूल स्पर्धेत १७ वे सुवर्णपदक मिळवले आहे.
राष्ट्रकूल स्पर्धा २०२२ मध्ये आज भारताने पदकांची लयलूट सुरुच ठेवली आहे. बॉक्सिंगमध्ये तर कमालच झाली.सलग तीन सुवर्ण पदकांवर भारताने आपले नाव कारले. नीतू गंघासने सुवर्ण पदकाला गवसणी घातली यानंतर अमित पंघलनेही सुवर्ण पदक पटकावत बर्मिंगहॅममध्ये तिरंगा फडकावला. यानंतर निखत जरीन हिने सवोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्ण पदक पटकावत प्रत्येक भारतीयांची मान गर्वाने उंचावेल अशी कामगिरी केली.