IND vs WI 2nd Test
IND vs WI 2nd Test

IND vs WI 2nd Test : वेस्टइंडिजने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजीचा निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत विरुद्ध वेस्टइंडिज दरम्यान मालिकेतील दुसऱ्या सामन्याला आज (दि.२०) सुरुवात झाली आहे. डोमिनिकाच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात भारताने वेस्टइंडिजवर १४१ धावांनी विजय मिळवला होता. दुसरा सामना त्रिनिदादच्या पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळवला जात आहे. वेस्टइंडिजचा कर्णधार क्रेग ब्रेथवेटने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतकडून वेगवान गोलंदाज मुकेश कुमार याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.

भारतीय संघ : यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, ईशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, जयदेव उनादकट, मुकेश कुमार, मोहम्मद सिराज।

वेस्टइंडीजचा संघ : क्रेग ब्रेथवेट (कप्तान), तेजनारायण चंद्रपॉल, किर्क मैकेंजी, जर्मेन ब्लैकवुड, एलिक अथानाजे, जोशुआ डा सिल्वा (यष्टीरक्षक), जेसन होल्डर, अल्जारी जोसेफ, केमार रोच, जोमेल वारिकन, शैनन गेब्रियल

हेही वाचलंत का?

logo
Pudhari News
pudhari.news