IND vs SL : वॉशिंग्टन सुंदर तातडीने कोलंबोत दाखल

IND vs SL : वॉशिंग्टन सुंदर तातडीने कोलंबोत दाखल

आशिया चषक 2023 स्पर्धेच्या फायनलपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. बांगलादेशविरुद्धच्या सुपर फोरच्या शेवटच्या सामन्यात 42 धावांची उत्कृष्ट खेळी करणारा अक्षर पटेल दुखापतग्रस्त झाला आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करताना अक्षरला दुखापत झाली होती. मात्र, आता अक्षर अंतिम सामन्यासाठी उपलब्ध नसल्याची माहिती समोर येत आहे. त्याच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला (Washington Sundar) कोलंबोला बोलावण्यात आले आहे. (IND vs SL)

23 वर्षीय वॉशिंग्टन सुंदर रविवारी श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यासाठी टीम इंडियामध्ये सामील होऊ शकतो. अक्षर पटेलचा बदली खेळाडू म्हणून सुंदरला कोलंबोला बोलावण्यात आले आहे. वॉशिंग्टन सुंदर हा आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी टीम इंडियाचा एक भाग आहे. त्यामुळे तो बंगळुरूमधील एनसीएमध्ये सराव करत होता. आशिया कप फायनलनंतर सुंदर पुन्हा बंगळुरूला पोहोचेल. चीनमध्ये 23 सप्टेंबरपासून आशियाई क्रीडा स्पर्धेला सुरुवात होणार आहे. मात्र, वॉशिंग्टन सुंदर श्रीलंकेविरुद्धच्या भारतीय प्लेइंग इलेव्हनचा भाग बनतो की, नाही हे पाहाणे उत्सुकतेचे ठरेल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news