‘ताडोबा’त साकरतोय पहिलाच प्रयोग, आता जिप्सीचे स्टेअरिंग महिलांच्या हातात!

‘ताडोबा’त साकरतोय पहिलाच प्रयोग, आता जिप्सीचे स्टेअरिंग महिलांच्या हातात!
Published on
Updated on

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : देश विदेशात व्याघ्र दर्शनाकरीता प्रसिध्द असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात आता पर्यंत पुरूषांच्या हातात निसर्ग पर्यटनाकरीता वापरण्यात येणाऱ्या जिप्सीचे स्टेअरिंग आहे. परंतु, आता ताडोबाच्या बफर व कोअर झोनमध्ये जिप्सीचे स्टेअरिंग महिलांच्या हातात येणार आहे. याकरीता ताडोबा व्यवस्थापनाने ताडोबाच्या बफर क्षेत्रात वसलेल्या गावातील आदिवासी महिलांना जिप्सी वाहन चालकाचे प्रशिक्षण सुरू केले आहे. महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पात महिलांच्या हातात जिप्सीचे स्टेअरिंग देण्याचा हा ताडोबातील हा पहिलाच प्रयोग आहे.

देश विदेशात चंद्रपूर जिल्हयातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रक्ल्पाची ओळख आहे. त्यामुळे देश विदेशतील पर्यटक या ठिकाणी वाघांच्या दर्शनाकरीता आवर्जून दरवर्षी येतात. या ठिकाणी सध्या कोअर आणि बफर झोन मध्ये होत असलेल्या निसर्गपर्यटनात सर्व जिप्सींचे स्टेअरिंग फक्त पुरूषांच्या हातात आहेत. काही स्थानिक तर काही बाहेरील जिप्सी या ठिकाणी पर्यटकांना भ्रमंती करतात. परंतु, आता पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून ताडोबातील जिप्सीचे स्टेअरिंग महिलांच्या हाता देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. दरम्यान ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या भरारी या उपक्रमा अंतर्गत बफर क्षेत्रातील आणि विशेषतः कोर क्षेत्राच्या अगदी जवळच्या गावातील १८ ते ३५ वयोगटातील युवती व महिलांकरिता चारचाकी वाहन चालक प्रशिक्षणाचा शुभारंभ आज रविवारी (25 जून ) ताडोबा-परिक्षेत्रातील खुटवंडा गावामध्ये पार पडला. उदघाटन सोहळ्याला उपस्थित असलेले वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक डॉ.जितेंद्र रामगावकर यांचे प्रेरणेतून आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक (कोअर) नंदकिशोर काळे यांच्या मार्गदर्शनात या उपक्रमाचा शुभारंभ पार पडला.

यावेळी सहाय्यक वनसंरक्षक (कोअर) महेश खोरे, वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण गोंड, वनपाल कामटकर, नन्नावरे यांची उपस्थिती होती. या प्रसंगी मोठ्या संख्येने युवती, महिला उपस्थित होत्या. यावेळी ताडोबातील खुटवंडा, घोसरी व सीतारामपेठ गावातील युवती व महिला, गावकरी, वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. विविध टप्यात हा उपक्रम राबविल्या जाणार असून पहिल्या टप्यात खुटवंडा, घोसरी व सीतारामपेठ या गावांचा समावेश आहे. त्यानंतर कोलारा, सातारा,बाम्ह्नणगाव, भामडेळी, कोंडेगाव व मोहर्ली येथील महिलांना प्रशिक्षीत केले जाणार आहे. जिप्सी वाहन प्रशिक्षणाकरीता ताडोबातील गावातील युवती महिलांचे 84 अर्ज वनविभागाला प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 61 आदिवासी महिलांचा सहभाग आहे. महिलांना जिप्सी वाहनाचे महिनाभरात शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देऊन भरारी उपक्रमांतर्गत लर्निग व पक्के लायसन्स काढून देण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणाचा खर्च ताडोबा-अंधारी व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान तर्फे करण्यात येत आहे. महिलांच्या हातात जिप्सीचे स्टेअरिंग देण्याकरीता सर्वप्रथत गावामध्ये महिलांसोबत चर्चासत्र, बैठक घेऊन वाहन चालविण्याविषयी महत्व व फायदे सांगण्यात आले. स्थानिक युवती व महिलांनी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग पर्यटनाकरिता वापरण्यात येणाऱ्या जिप्सी वाहन चालक म्हणून कार्य करणे, शासकीय-निमशासकीय सेवेमध्ये या प्रशिक्षणाचा लाभ घेणे तसचे व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रामध्ये विविध रिसोर्टमध्ये पर्यटकांसाठी वाहन चालक म्हणून कार्य करणे या उपक्रमाचा उदेश्य आहे. कार्यक्रमाची जबाबदारी पर्यावरण शिक्षण अधिकारी व उपजीवीका तज्ञ प्रफुल्ल सावरकर यांनी पाडली.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news