Sameer Wankhade : आयआरएस अधिकारी समीर वानखडे यांच्या समर्थनार्थ वाशीममध्ये समाज बांधवांच्यावतीने मोर्चाचे आयोजन

Sameer Wankhade
Sameer Wankhade

वाशीम; पुढारी वृत्तसेवा : आयआरएस अधिकारी समीर वानखडे हे प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून परिचित आहेत. परंतू ते केवळ मागासवर्गीय असल्यामुळे व समाजात त्यांची प्रचंड लोकप्रियता असल्यामुळेच त्यांच्यावर सीबीआयने छापा टाकून बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे समीर वानखडे यांच्या समर्थनार्थ वाशीम येथे बुधवारी १७ मे रोजी निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला असून या मोर्चात समाजबांधवांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

आयआरएस अधिकारी समीर वानखडे हे एनसीबी मुंबईचे झोनल अधिकारी असताना सिनेअभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान यांच्यावर ड्रग्स प्रकरणी कारवाई केली होती. कायद्याचे उल्लघन करणाऱ्यावर कारवाई करणे हा गुन्हा नसून समीर वानखडे हे केवळ मागासवर्गीय अधिकारी असल्यामुळे व समाजात त्यांची प्रचंड लोकप्रियता आहे. त्यामुळे त्यांची नाहक बदनामी करण्यासाठीच त्यांच्या घरावर सीबीआयने छापेमारी केली. परंतू त्यांच्या घरी काहीच आढळून आले नाही. अमली पदार्थ तस्करी विरोधात धडाकेबाज कारवाई करणारे आयआरएस अधिकारी समीर वानखडे यांना सरकारने पाठबळ देण्याची गरज आहे. समीर वानखडे यांना पाठींबा देण्यासाठी समाज बांधवांच्यावतीने बुधवार १७ मे रोजी वाशीम शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला पॅथर संघटनेचे दीपक केदार व समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या मोर्चात समाजबांधवानी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news