Sindhudurg District Bank : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत दादाची दादागिरी कायम! भाजप ११ जागा तर महाविकास आघाडीला ८ जागांवर विजय

Sindhudurg District Bank : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत दादाची दादागिरी कायम! भाजप ११ जागा तर महाविकास आघाडीला ८ जागांवर विजय

कुडाळ; प्रमोद म्हाडगुत : लक्षवेधी ठरलेल्या जिल्हा बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या सिध्दिविनायक सहकार पॅनेलने ११ जागावर विजय मिळवित निर्विवाद वर्चस्व मिळविले. तर शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेसच्या सहकार वैभव पॅनलला केवळ ८ जागांवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतिश सावंत व भाजप पँनलचे प्रमुख राजन तेली यांचा या निवडणुकीत पराभव झाला. (Sindhudurg District Bank)

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत १९ जागासाठी एकुण ३९ उमेदवार रिंगणात उतरले होते. सकाळी ९ वा. पासुन मतमोजणीला ओरोस येथील शिक्षक पतपेढी हाँलमध्ये सुरुवात झाली आणि याठिकाणी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांच्यासह विद्यमान दहा संचालक या निवडणुकीत पराभूत झाले.

Sindhudurg District Bank : असे असतील उमेदवार

१) पतसंस्था मतदार संघ

सुशांत नाईक (शिवसेना) ७८  विजयी
राजन तेली (भाजप) ६३      पराभूत

२. पणन मतदार संघ

सुरेश दळवी  (राष्ट्रवादी) २६     पराभूत
अतुल काळसेकर (भाजप) ४४  विजयी

३)मजूर औद्योगिक संस्था

लक्ष्मण आगणे (शिवसेना) ८५  पराभूत
गजानन गावडे (भाजपा) ११० विजयी

४) मच्छीमार दुग्ध संस्था संघ

मधुसुदन गावडे  (राष्ट्रवादी) २७  पराभूत
महेश सारंग (भाजपा) ३३        विजयी

५) घर बांधणी देखरेख संस्था

विनोद मर्गज (राष्ट्रवादी) ५४     पराभूत
संदीप परब (भाजपा) ६८

६)पनण मतदार संघ

अतुल काळसेकर(भाजप) ४४ विजयी
सुरेश दळवी (राष्ट्रवादी) २६ पराभुत

६) वैयक्तिक मतदार संघ

विकास सावंत (काँग्रेस) ८५      पराभूत
समिर सावंत (भाजपा) ११०     विजयी

७) महिला प्रतिनिधी मतदार संघ

अनारोजिन लोबो ( शिवसेना) ४५७ पराभूत
निता राणे (काँग्रेस) ५०३        विजयी
प्रजा ढवण (भाजपा) ४८०      विजयी
अस्मीता बांदेकर (भाजपा) ४५९   पराभूत

८) अनुसूचित जाती मतदार संघ

आत्माराव ओटवणेकर (राष्ट्रवादी) ५०६ विजयी
सुरेश चौकेकर (भाजपा) ४५८    पराभूत

९) इतर मागास मतदार संघ

मनिष पारकर (शिवसेना) ४८१   पराभूत
रविंद्र मडगांवकर (भाजपा) ४८४   विजयी

१०) विमुक्त भटक्या जमाती मतदार संघ
मेघनाथ धुरी (काँग्रेस) ५१७     विजयी
गुलाबराव चव्हाण (भाजपा) ४५१   पराभूत

तालुका मतदारसंघ कणकवली

सतिश सावंत (शिवसेना) १७ पराभूत
विठ्ठल देसाई (भाजपा) १७  ईश्वरी चिठ्ठिने विजयी
विद्यार्थी देवेश नरेंद्र येडके याच्या हस्ते चिट्टी काढून श्री.देसाई विजयी झाले आणि सतिश सावंत यांचा पराभव झाला.

देवगड

अविनाश माणगावकर (अपक्ष) १७ पराभूत
प्रकाश बोडस (भाजपा) १९   विजयी

दोडामार्ग

गणपत देसाई ( शिवसेना) ७  विजयी
प्रकाश गवस ( भाजपा) ५    पराभूत

वेंगुर्ला

मनीष दळवी ( भाजपा) १३   विजयी
विलास गावडे (काँग्रेस) ८      पराभूत

मालवण

व्हिक्टर डान्टस (राष्ट्रवादी) १९     विजयी
कमलाकांत कुबल (भाजपा) ११   पराभूत

सावंतवाडी

विद्याधर परब (शिवसेना) १७    विजयी
गुरुनाथ पेडणेकर ( भाजपा) १६   पराभूत

कुडाळ

विद्याप्रसाद बांदेकर (काँग्रेस) २०  विजयी
प्रकाश मोर्ये (भाजपा) १५          पराभूत
सुभाष मडव (अपक्ष) १            पराभूत

दोडामार्ग

दिगंबर पाटील ( शिवसेना) ९     पराभूत
दिलीप रावराणे ( भाजपा) ११    विजयी

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news