File Photo
File Photo

पेट्रोलची सव्वाशेकडे दमदार वाटचाल, मोदी सरकारकडून फक्त ११ दिवसांत ७ रुपये ८० पैशांची वाढ

Published on

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही दिलासा मिळालेला नाही. आजही रविवारी म्हणजेच 3 एप्रिल 2022 रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

सरकारी तेल विपणन कंपन्यांनी आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80-80 पैशांनी वाढ केली आहे. शुक्रवारी दर स्थिर ठेवण्यात आले होते, मात्र शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी तेल 80-80 पैशांनी महागले.

या वाढीनंतर आज राजधानी दिल्लीत पेट्रोल 103.41 रुपये प्रति लीटर तर डिझेल 94.67 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 84 पैशांच्या वाढीसह 118.41 तर डिझेल 85 पैशांनी 102.64 रुपयांनी विकले जात आहे.

देशातील आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या बाजारातील किमतींनुसार इंधन तेलाच्या देशांतर्गत किमती दररोज सुधारल्या जातात. या नवीन किमती दररोज सकाळी 6 वाजता लागू होतात. तुम्ही घरी बसूनही इंधनाची किंमत जाणून घेऊ शकता.

घरी बसून तेलाची किंमत जाणून घेण्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइल संदेश सेवा अंतर्गत ९२२४९९२२४९ या मोबाईल क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. तुमचा संदेश 'RSP-पेट्रोल पंप कोड' असेल. तुम्हाला हा कोड इंडियन ऑइलच्या https://iocl.com/petrol-diesel-price या पेजवरून मिळेल.

हे ही वाचलं का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news