Weight loss : वजन कमी करायचंय, तर ‘या’ धान्यांचं सेवन करा

Weight loss : वजन कमी करायचंय, तर ‘या’ धान्यांचं सेवन करा

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज प्रत्येकाची जीवनशैली बदललेली आहे. कामाचा ताण आणि धकाधकीच्या जगण्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे दूर्लक्ष होतं राहतं. परिणामी, आपलं वजन वाढायला (Weight loss) सुरूवात होते. आहारात बदल करायला पाहिजे. परंतु, आहारातील बदल म्हणजे नेमकं काय? तर आज आपण आपल्या आहारात कोणती धान्यं असायला हवीत, जेणे करून आपलं वजन कमी होईल किंवा नियंत्रणात राहील याची सविस्तर माहिती घेऊ या…

तपकिरी रंगाचा तांदूळ (Brown Rice) 

वजन कमी करण्यामध्ये ब्राऊन राईस महत्वाचं धान्य मानलं जातं. कारण, त्यामध्ये भरपूर व्हिटॅमीन्स असतात. त्यामुळे ब्राऊन राईसला सुपर फूड असंही मानलं जातं. तज्ज्ञ असं सांगतात की, ब्राऊन राईसमध्ये बी व्हिटॅमीन, मॅग्नेशियम, फाॅस्फरस, मॅग्नेशियम, एंटीऑक्सिडेंट इत्यादी महत्वाचे घटक शरीरासाठी फायदयाचे असतात. इतकंच नाही तर ब्राऊन राईसमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्यामुळे शरीरातील कोलेस्टोराॅल आणि शुगर (साखर) नियंत्रित राहते. पचनक्रियाच्या ज्या समस्या असतात, त्या समस्याची ब्राऊन राईसमुळे नाहीशा होतात. विशेष म्हणजे ब्राऊन राईसमुळे पोट खूप काळ भरलेले राहत असल्यामुळे वारंवार भूक लागत नाही. परिणामी, वजन कमी होण्यास मदत होते.

ओट्स (Oats) 

आपलं वजन कमी करण्यास ओट्स महत्वाची भूमिका बजावतो. ओट्समध्ये बीटा-ग्लुकाॅन असल्यामुळे आपली भूक तो थांबवून ठेवतो. त्यामुळे भूक लवकर लागत नाही आणि जेवलात तर कमी जेवता. परिणामी, वजन कमी होण्यास मदत होते. इतकंच नाही तर, ओट्स हा बीटा-ग्लुकाॅन पेप्टाईड होर्मोन तयार करतो, त्यामुळे तुम्ही अन्नातून कमी कॅलरीज खाता. त्यामुळे तुमचा लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर ओट्समधील फायबरही कोलेस्टेराॅल कमी करण्यास मदत करतो, त्यामुळे हृदयासंबंधीचे आजार नियंत्रीत राहतात.

कुटू (buckwheat) 

उत्तर भारतात प्रामुख्याने हे धान्य पहायला मिळतं. त्यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आपली भूक नियंत्रणात राहते. कारण, कुटूच्या धान्यापासून जे पदार्थ आपण खातो, त्यामुळे आपलं पोट भरलेलं राहतं. सहाजिकच आपल्याला भूक कमी लागते. त्यामुळे आपलं वजन कमी होण्यास मदत मिळते. कुटूच्या पदार्थांमधून आपल्या शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते. त्यामुळे कुटूला वजन कमी करण्यास मदत करणारा सर्वात महत्वाचा घटक म्हणून संबोधलं जातं.

मोहरीचे दाणे (Rye) 

मोहरीच्या दाण्यामध्ये कॅल्शियम, मॅंगनीज, लोह, प्रथिने आणि फायबर असतात. त्याचा आपल्या आहारात उपयोग केला तर जास्त प्रमाणात ऊर्जा मिळत राहते. यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आपली भूक पूर्ण करते आणि जास्त वेळ ऊर्जा टिकवून ठेवते. परिणामी, आपल्या वारंवार भूक लागत नाही आणि आपण जास्त खात नाही. अर्थात आपलं वजन घटविण्यास मोहरीचे दाणे महत्वाचे ठरतात. इतकंच नाही तर, पचनक्रिया आपली व्यवस्थित राहते.

क्विनोआ (quinoa) 

क्विनोआमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असल्यामुळे कोलेस्टेराॅल आणि वजन कमी करण्यासाठी मोठा घटक मानला जातो. जर आपण एक कप शिजवलेले क्विनोआ खाल्ले तर त्यातून 222 कॅलरीज मिळतात. त्यातून 3 ग्रॅम फायबर मिळते. एक संतुलिक आहार ठेवण्यासाठी आणि आपलं वाढलेलं वजन कमी करण्यासाठी क्विनाआ अत्यंत महत्वाचा घटक मानला जातो.

हे सर्व धान्य आपण आपल्या आहारात घेतले, तर आपल्या भूकेवर नियंत्रण राहतं आणि सहाजिकच जास्तीचं खाणं आपल्याकडून होत नाही. परिणामी, आपलं वजन नियंत्रित राहण्यास आणि कमी करण्यास वरील धान्य महत्वाची भूमिका बजावतात. पण, लक्षात आपल्या आहारात पांढरा तांदूळ आणि गहू असेल तर ते पूर्णपणे टाळावं. कारण, आपलं वजन वाढविण्यास ही धान्य महत्वाची असतात. चला तर आपलं कमी करायचं ना? तर आपल्या रोजच्या आहारात मोहरीचे दाणे, क्विनोआ, ओट्स, ब्राऊन राईस, कुटू यांसारख्या धान्यांचा वापर वाढवू आणि आपलं वजन नियंत्रणात ठेवू.

पहा व्हिडीओ : अपघातग्रस्तांची जीवन रक्षक १०८ अम्ब्युलन्स

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news