उच्चशिक्षण घेत असाल तर ‘या’ संस्थेकडून मिळेल स्कॉलरशिप; पात्र असाल तर करा अर्ज

फेडरल बँक
फेडरल बँक
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : फेडरल बँके तर्फे २०२३-२४ च्या शैक्षणिक वर्षा करता फेडरल बँक हॉर्मिस मेमोरियल फाऊंडेशन स्कॉलरशिप साठी अर्ज मागवण्यात येत आहेत. बँकेच्या सीएसआर उपक्रमाअंतर्गत हा स्कॉलरशिप प्रकल्प राबवण्यात येत असून हा उपक्रम बँकेचे संस्थापक कै. श्री के पी हॉर्मिस यांच्या स्मरणार्थ राबवण्यात येतो.

ही स्कॉलरशिप साठी पात्र अभ्याक्रमांमध्ये एमबीबीएस, इंजिनियरींग, बीएससी नर्सिंग, एमबीए आणि कृषी विद्यापिठांद्वारे आयोजित करण्यात येणा-या बीएससी ॲग्री सह बीएससी (ऑनर्स) को ऑपरेशन ॲन्ड बँकिंग सह ॲग्री सायन्सेस चा समावेश आहे. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु ३ लाखांपेक्षा कमी असावे. देशासाठी बलिदान देणा-या सशस्त्र दलातील कर्मचा-यांच्या मुलांचा वेगळ्या चॅनलने विचार केला जाणार असून या विभागात अर्ज करणा-या विद्यार्थ्यांसाठी कौटुंबिक उत्पन्नाची अट असणार नाही. या स्कॉलरशिपसाठी अर्ज करणा-या विद्यार्थ्यांनी मेरिट वर सरकारी/अनुदानित/सरकारमान्य सेल्फ फायनान्सिंग/खाजगी कॉलेजात पहिल्या वर्षाला शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये प्रवेश घेतलेला असावा.

फेडरल बँकेचे चीफ ह्युमन रिसोर्सेस ऑफिसर अजितकुमार के के यांनी सांगितले " बँकेच्या सीएसआर उपक्रमांचे आयोजन हे आमच्या हृदयाच्या जवळचे असून या माध्यमातून आम्ही समाजाला सुदृढ करुन, शाश्वत पर्यावरणासह भविष्याच्या संरक्षणासाठी आम्ही करत असतो. शिक्षणाप्रती आमची बांधिलकी, विशेषत: व्यावसायिक मार्ग, आर्थिक अडचणींशी सामना करणाऱ्यांसाठी मार्गदर्शक असते. त्यांची स्वप्ने साकार करण्यात आम्ही आमचे योगदान देत असल्याने ते केवळ त्यांचा कोर्सच पूर्ण करत नाहीत तर ते सुयोग्य रोजगाराच्या दिशेने योग्य पावलेही टाकत आहेत."

केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात आणि पंजाब मधील विद्यार्थी या स्कॉलरशिपसाठी पात्र असतील. प्रत्येक क्षेत्रातील एक जागा ही दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राखीव असेल आणि त्याच बरोबर आणखी एक विभाग हा बोलण्यास/ऐकण्यास/दृष्टिने सक्षम नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी असेल. या करता त्यांना डीएमओ किंवा बँकेच्या मान्यताप्राप्त मेडिकल ऑफिसर कडून प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. जर या दिव्यांग विभागातून अर्ज करता आला नाही तर हा अर्ज साधारण विभागात गणला जाईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना १०० टक्के शैक्षणिक फी आणि अन्य शैक्षणिक खर्च हा कॉलेजच्या फी नुसार देण्यात येईल, या करता अधिकतर खर्च हा १ लाख रुपये प्रती वर्ष असेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही १७.१२.२०२३ आहे.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news