MP Dhairyasheel Mane : खासदार धैर्यशील माने यांची ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी अडवली गाडी

MP Dhairyasheel Mane : खासदार धैर्यशील माने यांची ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी अडवली गाडी

इचलकरंजी; पुढारी वृत्तसेवा : हातकणंगले तालुक्यातील मौजे चंदूर येथे खा.धैर्यशील माने यांची गाडी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी अडवली. यावेळी तुम्ही शिवसेनेशी गद्दारी का केली, असा जाब या कार्यकर्त्याने विचारला. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान पोलिसांनी मध्यस्थी केली आणि जमावाला शांत करत खा. माने यांच्या गाडीला मार्ग करून दिला. (MP Dharishsheel Mane)

चंदूर येथे आयोजित मोफत आधार कार्ड कॅम्पच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार धैर्यशील माने आले होते. यावेळी भागातील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन खासदार धैर्यशील माने यांना जाब विचारत तुम्ही गद्दारी का केली, सहा महिने फक्त हेरगिरी करण्यासाठी शिवसेनेत आला होता का?, उद्धव साहेबांनी विश्वास ठेवून तुम्हाला लोकसभेचे तिकीट दिले, तरी शिवसेना का सोडली?, आम्ही आमच्या रक्ताचे पाणी करून तुमचा प्रचार केला व तुम्ही शिवसेना का सोडली? अशा प्रकारचे प्रश्न विचारत अनेक आरोप केले. त्याचबरोबर ५० खोके एकदम ओके अशा प्रकारच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्याचबरोबर शिंदे गटाचे कार्यकर्तेही जमा झाले. दोन्ही गट समोरासमोर आल्याने दोन्ही गटात वादाची ठिणगी पडली. दोन्ही बाजूंनी वादावादी सुरू झाली.परिस्थिती पाहून पोलिसांनी, दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना हुसकावून लावत खासदार धैर्यशील माने यांच्या गाडीला वाट करून दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news