एचआयव्ही संक्रमण रोखण्यासाठी हायड्रोजन सल्फाईड सहायक

एचआयव्ही संक्रमण रोखण्यासाठी हायड्रोजन सल्फाईड सहायक

बंगळूर : भारतीय संशोधकांना एका नव्या संशोधनात आढळले आहे की एचआयव्ही संक्रमित रोगप्रतिकारक पेशींमधील एचआयव्हीची वृद्धी कमी करून तिला रोखण्यासाठी हायड्रोजन सल्फाईड हा वायू सहायक ठरू शकतो. बंगळूरच्या भारतीय विज्ञान संस्था (आयआयएससी) मधील संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे. एचआयव्हीविरुद्ध अधिक व्यापक अँटिरेट्रोव्हायरल थेरेपी विकसित करण्याचा मार्ग या संशोधनाने प्रशस्त होऊ शकतो असे संशोधकांनी म्हटले आहे.

सध्याची अत्याधुनिक संयुक्त अँटिरेट्रोव्हायरल थेरेपी ही एचआयव्हीवरील उपचार नाही. ती केवळ विषाणूला दाबून ठेवते. याचा अर्थ आजार शरीरात गुप्त रूपाने राहतो. काही बाबतीत रुग्णांनी योग्यप्रकारे औषधे घेतल्यावरही संयुक्त अँटिरेट्रोव्हायरल थेरेपी किंवा 'कार्ट' अयशस्वी ठरते. या पद्धतीत काही अन्य नकारात्मक प्रभावही आहेत. या पद्धतीमध्ये निर्माण झालेले विषारी अणू 'ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस'चे कारण बनतात.

त्यामुळे पेशींचे पॉवरहाऊस मानल्या जाणार्‍या 'मायटोकॉन्ड्रीया'ची हानी होते. यामुळे सूज आणि विविध अवयवांची हानी संभवू शकते. 'कार्ट'ला एकदम बंद करणेही योग्य ठरत नाही. याचे कारण म्हणजे उपचाराअभावी विषाणू पुन्हा सक्रिय होऊ शकतो. आता 'कार्ट'ला पूरक म्हणून हायड्रोजन सल्फाईड कसा सहायक ठरू शकतो हे दिसून आले आहे. त्याच्यामुळे एचआयव्हीला सुप्त स्थितीतच 'लॉक' केले जाऊ शकते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news