पालघर : लिव्ह इन पार्टनरची केली हत्या आणि मृतदेह बेड बाॅक्समध्ये लपवला

crime
crime

मिरा रोड : पुढारी वृत्तसेवा; तुळींज पोलीस ठाणे हद्दीत एका इमारतीमधील फ्लॅटमध्ये एका महिलेचे प्रेत आढळून आले होते.' त्या महिलेची हत्या करून तिचा पती पळून गेल्याचे तेथील रहिवाशांनी सांगितले. तेव्हा गुन्हे शाखा, कक्ष २ वसई युनिटने तपास करून अवघ्या काही तासात पत्नीची हत्या करणाऱ्या पतीस मध्य प्रदेशातून अटक केली आहे.

तुळींज पोलीस ठाणे हद्दीमध्ये राहणारे संजीव रामस्वरुप अकुर यांनी १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास सिता सदन अपार्टमेंटमध्ये मयत महीला नामे मेघा हार्दीक शाह उर्फ मेघा धनसिंग तोरवी या महिलेचा पती हार्दीक राजुभाई शहा याने काही दिवसांपूर्वी खून करून तिचे प्रेत घरातील बेडमध्ये लपवुन रूमला बाहेरून कुलुप लावून कोठेतरी निघून गेल्याचे सांगितले. त्यावरून तुळींज पोलीस ठाण्यात भा.दं.वि.सं. कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या खुनाच्या गुन्हयातील आरोपी हार्दीक यास अटक करण्यासाठी तपास पथके तयार करून आरोपीचा शोध घेतला. त्यावेळी आरोपी हा पश्चिम एक्सप्रेस या गाडीने प्रवास करीत असल्याची माहीती मिळाली. आरोपीस तात्काळ ताब्यात घेण्यासाठी नागदा रेल्वे पोलीस दलाशी संपर्क करून आरोपी हार्दीक याला नागदा जंक्शन, मध्य प्रदेश येथून अटक करण्यात आली. त्यास विश्वासात घेवून तपास केला असता त्याला कोणताही कामधंदा नसून घरात खर्च होणारे पैशासाठी त्याचे व त्याच्या पत्नीचे वारंवार भांडण होत असल्याने त्याने कंटाळुन पत्नी मेघाचा गळा आवळून खून केल्याचे सांगितले. तुळींज पोलीस पुढील तपास करत आहे.

हेही वाचा :  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news