Hrithik Roshan : सबाचा व्हिडीओ पाहून हृतिक पडला प्रेमात

Saba Azad हृतिक रोशन
Saba Azad हृतिक रोशन

पुढारी ऑनलाईन : अभिनेता हृतिक रोशन ( Hrithik Roshan ) नेहमीच त्याच्या खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो. सध्या अभिनेता गर्लफ्रेंड सबा आझाद हिच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आहे. नुकताच हतिक गर्लफ्रेंड सबा हिच्यासोबत सुनैना रोशनच्या वाढदिवसाला पोहोचला होता. सबा आता रोशन कुटुंबातील महत्त्वाच्या कार्यक्रमादरम्यान उपस्थित असते. गेल्या अनेक दिवसांपासून सबा आणि हृतिक एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

सबा आणि हृतिकच्या लव्हस्टोरीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. दोघांच्या लव्हस्टोरीची सुरूवात ट्विटरवरुन झाली. सबा आणि हृतिक यांची मैत्री ट्विटरवरून झाली. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. हृतिकला सबा हिचा एक व्हिडीओ प्रचंड आवडला होता आणि तो व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला होता. व्हिडीओत सबा एका आंतरराष्ट्रीय रॅपरसोबत गात होती. सबाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हृतिकने सबाला मेसेज केला होता. त्यानंतर दोघांच्या मैत्रीला सुरुवात झाली. ( Hrithik Roshan )

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news