Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | रविवार १७, २०२३

आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on
Updated on

मेष : श्रीगणेश सांगतात, आजचा दिवस तुमच्‍यासाठी अनुकूल आहे. मागील काही दिवस भेडसविणार्‍या समस्येवर उपाय शोधल्यास दिलासा मिळेल. गुंतवणुकीसाठी वेळ योग्य आहे. आज दुपारची परिस्थिती थोडी प्रतिकूल जाणवू शकते. खर्च टाळा. घरगुती खर्चासाठी संतुलित बजेट तयार करणे देखील महत्त्वाचे आहे. न्यायालयीन प्रकरणांमध्ये काही अडचणी येतील. कौटुंबिक वातावरणात सामंजस्य राहील. वातावरणातील बदलापासूनच्‍या आजारांपासून सावध रहा.

वृषभ : आज पाहुण्‍याची वर्दळ राहिल. भेटवस्तूंची देवाणघेवाण होईल, असे श्रीगणेश म्‍हणतात. खर्च वाढला तरी कुटुंबाच्‍या आनंदासाठी तो योग्‍य असेल. तरुण वर्ग भविष्यातील योजनांबाबत गंभीर असेल. तुमच्‍या कामावर लक्ष्‍य केंद्रीत करा. व्यवसायात अधिक परिश्रमाची गरज. पती-पत्नीमध्ये वाद होण्‍याची शक्‍यता आहे. घरातील वडीलधाऱ्यांचे आरोग्य जपा.

मिथुन : कठोर परिश्रमाने आज तुम्ही हवे ते सर्व साध्य करू शकता. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद लाभेल. कुटुंबासोबत वेळ व्‍यक्‍तितकेल्‍याने मन प्रसन्न राहील, असे श्रीगणेश सांगतात. आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वच करा अन्‍यथा नुकसानीची शक्‍यता आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. गुणवत्तेशी कोणतीही तडजोड करू नका. कामावर चालू असलेल्या आळसाचा कौटुंबिक जीवनावर परिणाम होऊ देऊ नका. तब्येतीत चढउतार अनुभवाल.

कर्क : आजचा दिवस कुटुंबासोबत आनंदात जाईल, असे श्रीगणेश म्‍हणतात. चांगली बातमी मिळेल. कार्यकुशलतेच्या सहाय्याने तुम्हाला हवे ते यश मिळेल. पण सगळे काही सुरळीत चाललं असलं तरी कुठेतरी कमीपणा जाणवेल. रागावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक सुख-शांती कायम राहील. अधिक परिश्रमामुळे थकवा जाणवेल.

सिंह : आज सांस्‍कृतिक कार्यक्रमाला उपस्‍थित राहण्‍याची संधी मिळेल. तुम्‍हाला मानसन्‍मान मिळेल, असे श्रीगणेश सांगतात. रागावर नियंत्रण ठेवा. दुसर्‍यावर विसंबून राहू नका. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्‍या. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. तब्येत ठीक राहील; पण जुन्या आजाराबाबत काळजी घ्यावी लागेल.

कन्या : आजचा दिवस उत्‍साह वाढविणारा असेल, असे श्रीगणेश म्‍हणतात. मुलांशी संयमाने वागा. नातेवाईकांशी व्यवहार करताना काळजी घ्या. बोलताना संयम सोडू नका. ज्यामुळे संबंध बिघडण्याची शक्यता आहे. काही प्रमाणात खर्चावर नियंत्रण आवश्यक. व्यवसायात नवीन लोकांशी व्‍यवहार सूरु करण्‍यापूर्वी विचार करा. कुटुंबात वातावरण चांगले राहिल. बद्धकोष्ठता, पोट फुगणे इत्यादी समस्या जाणवण्‍याची शक्‍यता.

तूळ : आज तुम्‍ही समर्पण भावनेने कार्य केले तर चांगले परिणाम मिळू शकतात, असे श्रीगणेश म्‍हणतात. महिला व्यक्तिमत्त्वावर विशेष लक्ष देतील. स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी वेळ योग्य आहे. त्याचा चांगला उपयोग करा. निष्काळजीपणा आणि दिरंगाईमुळे आवश्यक व महत्त्वाची कामे अपूर्ण राहू शकतात. कामाचा दर्जा सुधारल्याने तुम्हाला चांगली ऑर्डर मिळू शकते. पती-पत्नीमधील मतभेद दूर होतील. डोकेदुखी, ताप इत्यादी आजार होण्‍याची शक्‍यता.

वृश्चिक : आज परिस्थितीत सकारात्मक बदल होईल. अनेक संधी उपलब्‍ध होतील, असे श्रीगणेश म्‍हणतात. नवीन काही शिकायलाही वेळ लागेल. हा अनुभव तुम्हाला व्यावहारिक जीवनात पुढे कामी येईल. चांगली बातमी देखील मिळेल. कौटुंबिक वातावरणात कुठेतरी अशांतता राहील. भावंडांशी समन्वय कमकुवत होऊ शकतो. उत्पन्नासोबत खर्चही जास्त होईल. आरोग्यात चढउतार अनुभवला.

धनु : आज जमीन किंवा वाहनाशी संबंधित महत्त्वाचे काम होऊ शकते, असे श्रीगणेश सांगतात. मित्रपरिवाराबरोबर वेळ घालवला. मुलाखतीतील यशामुळे तरुण वर्गाचा आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला थोडा त्रास होईल. कौटुंबिक सदस्यांची कठीण प्रसंगी साथ मिळेल. रक्तदाबाशी संबंधित समस्या असू शकतात.

मकर : आज महत्त्वाची माहिती मिळू शकते. तसेच पैशाशी संबंधित कामे पूर्ण होतील, असे श्रीगणेश म्‍हणतात. मुलांबद्दल चिंता राहील. विनाकारण भीती आणि अस्वस्थता राहील. यामुळे तुम्ही तुमच्या क्षमतेचा योग्‍य उपयोग करू शकणार नाही. कामात अधिक गांभीर्य आवश्यक आहे. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. संतुलित आहारासोबतच व्यायामाकडे लक्ष द्या.

कुंभ : आज तुम्‍हाला नशीबाची साथ मिळेल. अडचणी आणि अडथळ्यांना न जुमानता तुम्ही सर्व महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल, असे श्रीगणेश सांगतात. मित्र आणि सहकाऱ्यांशी संबंध चांगले राहतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. तुम्ही जमीन किंवा वाहनासाठी कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर पुनर्विचार करा. बाहेरच्या व्यक्तीमुळे पती-पत्नीमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात. वाहन चालवताना काळजी घ्‍या.

मीन : सकारात्मक लोकांशी संवादामुळे उत्तम वेळ जाईल. दैनंदिन कामांव्यतिरिक्त, तुम्ही इतर कामे सहजतेने पूर्ण कराल, असे श्रीगणेश सांगतात. काही लोकांमध्ये अपमानही होऊ शकतो. रुपया खर्च होण्‍यापूर्वी पुन्‍हा मिळण्‍याचा मार्ग मोकळा झालेला असेल. चुकीच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. कर्मचार्‍यांशी भागीदारी आणि चालू असलेले संबंध तणाव कमी करतील. प्रत्येक कठीण प्रसंगात कुटुंबातील सदस्य तुमच्या पाठीशी उभा राहील. सर्दी, खोकला आणि ॲलर्जीचा त्रास होण्‍याची शक्‍यता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news