Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | बुधवार १३, २०२३

आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on
Updated on

मेष : श्रीगणेश सांगतात, आजचा दिवस तुमची सकारात्मक वागणूक तुम्हाला लक्षणीय यश मिळवून देईल. नातेवाईकांशी संबंध दृढ होतील. मालमत्तेच्‍या कामात अडचण संभवते. भावंडांशी संबंध बिघणार नाहीत याची काळजी घ्‍या. तुमच्‍या सहकार्यांमुळे मुलांच्‍या समस्‍या सुटण्‍यास मदत होईल. व्यवसायासाठी अनुकूल वातावरण. कोणतीही समस्या सोडवण्यासाठी तुमच्या जोडीदाराचा सल्ला घ्या.

वृषभ : आज तुम्‍ही राजकीय आणि सामाजिक कार्यात रस घ्‍याल. नवीन वाहन खरेदीची योजना असेल, असे श्रीगणेश म्‍हणतात. उधारी फेडू शकाल. विद्यार्थ्यांनी मित्रांसोबत वेळ वाया घालवण्‍यापेक्षा अभ्यासात लक्ष केंद्रीत करणे हिताचे ठरेल. व्यवसायात तुमच्‍या संवादमुळे फायदा होईल. ॲलर्जीमुळे घसा खवखवण्‍याचा त्रास होवू शकतो.

मिथुन : आज तुम्ही दैनंदिन दिनक्रमापेक्षघ नवीन काहीतरी करण्‍याचा प्रयत्‍न कराल, यामुळे मानसिक आणि शारीरिक थकवा दूर होण्‍यास मदत होईल, असे श्रीगणेश सांगतात. तुमच्‍या उदारतेचा कोणीतरी फायदा घेऊ शकते. एखाद्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी विचार करा. मित्रांसोबत विनाकारण फिरल्‍यामुळे वेळेचा वाया जाईल. भागीदारीशी सबंधित व्यवसायात पारदर्शकता ठेवा. पती-पत्नीमध्ये योग्य समन्वय राखला जाईल. आरोग्य चांगले राहिल.

कर्क : आज उच्चपदस्थ लोकांशी संपर्क झाल्‍याने तुम्‍हाला यशाचा नवीन मार्ग मोकळा होईल, असे श्रीगणेश म्‍हणतात. विरोधक तुमच्‍या विरोधात सक्रीय होण्‍याची शक्‍यता आहे त्‍यामुळे कोणतेही महत्त्वाचे काम करण्यापूर्वी विचार करुनच कृती करा. एखादी लहान चूक तुम्‍हाला त्रास देऊ शकते. पती-पत्नीमधील दुरावा कमी होईल. बदलत्या वातावरणाचा आरोग्‍यावर परिणाम होण्‍याची शक्‍यता.

सिंह : आज घरातील बदल किंवा नूतनीकरणाचे काम सुरु करताना नियमांचे पालन करा. आर्थिक परिस्‍थितीचा विचार करुनच खर्च करा, असे श्रीगणेश सांगतात. मालमत्तेच्या कारणातून घरातील जवळच्या नातेवाईकांशी वाद होण्‍याची शक्‍यता. व्यवसायात अधिक व्यस्त राहाल. घरातील वातावरण संतुलित ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या वागण्यात अधिक सकारात्मक बदल करणे आवश्यक आहे. खाण्‍याकडे दुर्लक्ष केल्‍यास पचन बिघडू शकते.

कन्या : आज न्यायालयीन प्रकरणाचा किंवा मालमत्तेशी संबंधित रखडलेल्या कामाचा निर्णय होण्‍याची शक्‍यता असल्‍याचे श्रीगणेश म्‍हणतात. कोणतीही कृती करताना जास्त सावधगिरी बाळगा. लहान चुकीमुळे मोठा आर्थिक भुर्दंड बसू शकतो. व्यावसायिक क्षेत्रातील कोणत्याही कामाकडे दुर्लक्ष करू नका. घरातील वातावरण आनंददायी राहिल. खाताना पथ्‍य पाळा.

तूळ : आज कोणतेही काम करण्‍यापूर्वी स्‍वत:च्‍या मताचा विचार करा. घरातील कोणतेही चांगले काम पूर्ण करण्याची योजना असेल, असे श्रीगणेश सांगतात. निष्काळजीपणामुळे जवळच्या नातेवाईकाशी संबंध खराब होणार नाहीत यासाठी दक्षता घ्‍या. मोठ्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. यंत्र आणि लोखंडाच्या व्यापारात लाभदायक यश मिळू शकते. पती-पत्नीच्या नात्यात योग्य समन्वय राखला जाईल. खाणे आणि दैनंदिन दिनचर्या व्यवस्थित ठेवा.

वृश्चिक : आज धार्मिक संस्थांशी संबंधित सेवा-कार्यात रस घेतल्याने तुम्हाला मनःशांती मिळेल. समाजात तुमचा आदर कायम राहील, असे श्रीगणेश सांगतात. तुमच्या ध्येयावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. वाहन खरेदी लांबणीवर टाका. आर्थिक व्यवहार सध्या सामान्य राहतील. अनावश्यक खर्च टाळा. व्यवसायात आज जास्त मेहनत घ्यावी लागेल. एकाच वेळी अनेक समस्या निर्माण होतील. पती-पत्नीच्या सहकार्याने एकमेकांचा आत्मविश्वास कायम राहील. एलर्जीचा त्रास होण्‍याची शक्‍यता.

धनु : आज कोणतीही कागदपत्रे सावधगिरीने हाताळा. एका छोट्याशा चुकीचे मोठे परिणाम होऊ शकतात, असे श्रीगणेश सांगतात. अनुभवी व्यक्तीचा सल्ला फायदेशीर ठरेल. भागीदारीबाबत विचार करत असाल तर सध्‍याची वेळ उत्कृष्ट आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आहारावर नियंत्रण ठेवा.

मकर : आज तुम्‍हाला एखाद्या गरजू मित्राला मदत केल्‍याने तुम्‍हाला मनःशांती मिळेल. मुलांना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळू शकते, असे श्रीगणेश सांगतात. कर्ज घेण्‍यापूर्वी विचार करा किंवा ज्‍येष्‍ठांचे मार्गदर्शन घ्‍या. आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. व्यवसायाच्या क्षेत्रात अडथळे येण्‍याची शक्‍यता. जोडीदार आणि कुटुंबाचा पाठिंबा मिळाल्‍याने कठीण परिस्थितीवर मात करण्‍यासाठी आत्मविश्वास वाढेल. अशक्तपणा जाणवू शकतो.

कुंभ : आज तुमचे मनोबलासह सन्मान आणि प्रतिष्ठा सामाजिकदृष्ट्याही वाढेल, असे श्रीगणेश सांगतात. काही आर्थिक चिंता राहील. मात्र ही समस्‍या काही काळासाठी आहे त्‍यामुळे चिंता करु नका. व्‍यवसायात नवीन योजना राबण्‍यिासाठी योग्‍यवेळ आहे. आरोग्य चांगले राहील.

मीन : आज दैनंदिन दिनचर्येत थोडे बदल करत तुमच्या आवडीच्या कामांसाठी वेळ द्‍या, असे श्रीगणेश सांगतात. कौटुंबिक वातावरणात चांगले बदल होतील. आर्थिक व्‍यवहारांवरील चर्चा टाळा. व्‍यवासाया संबंधित किंवा आर्थिक व्‍यवहार करताना कागदपत्रांवर लक्ष ठेवा. पती-पत्नीच्या नात्यात गैरसमज होऊ शकतात. पोटाच्‍या विकारांचा त्रास होण्‍याची शक्‍यता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news