राशिभविष्य
मेष : आरोग्य एकदम चोख असेल. भूतकाळातील गुंतवणुकीतून आमदनी वाढणे द़ृष्टिपथात येईल. जुन्या संबंधांना उजाळा देण्यासाठी चांगला दिवस.
वृषभ : अन्य लोकांच्या यशाबद्दल त्यांचे कौतुक करीत तुम्ही तो आनंद साजरा कराल. अतिरिक्त पैसा सुरक्षित स्थळी ठेवा. त्याचा भविष्यात लाभ होईल.
मिथुन : अत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आरोग्य चांगले असेल, पण आरोग्याला गृहित धरू नका. काळजी घेणे ही गरज.
कर्क : तुमची देण्याची वृत्ती म्हणजे अप्रत्यक्ष मदत करण्याची वृत्ती होय. त्यामुळे शंका, निरुत्साह, अश्रद्धा, मत्सर, हेवा, गर्वापासून तुम्ही मुक्त व्हाल.\
सिंह : आरोग्याच्या तक्रारीमुळे एका महत्त्वाच्या कामावर तुम्हाला जाता न आल्यामुळे तुम्हाला माघार घ्यावी लागेल, पण तर्कशास्त्र वापरून पुढे जात राहा.
कन्या : कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच करा. येनकेन प्रकारे आर्थिक लाभ होतील.
तूळ : आजारातून बरे होण्याची शक्यता असल्याने तुम्ही खेळाच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकाल. लोकांना नेमके काय हवेय हे समजावून घ्या.
वृश्चिक : हास्य हे नैराश्य घालविण्यासाठीचा उत्तम उपाय ठराल. जवळच्या व्यक्तीसोबत भांडण होऊ शकते आणि ही गोष्ट इतरांपर्यंत जाऊ शकते.
धनु : तुम्ही धन कमावण्यासाठी प्रयत्न करत असाल तर संध्याकाळी धनलाभ होऊ शकतो. कुटुंबात अचानक घडलेल्या घटनेने आश्चर्यचकित व्हाल.
मकर : विनाकारण तुमचा उत्साह घालवू नका. तुम्ही धन धार्मिक कार्यात लावू शकता, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळण्याची शक्यता आहे.
कुंभ : स्वत:ला क्रिएटिव्ह कामात गुंतवून घ्या. काहीही न करता बसून राहण्याची आपली सवय मानसिक शांततेला घातक ठरू शकते.
मीन : जर तुम्ही कुणालातरी भेटण्याची योजना तुमच्या जोडीदाराच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे बारगळली तरी तुम्ही एकमेकांसोबत चांगला काळ घालवाल.
-ज्यो.मंगेश महाडिक